vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

 

मुंबई, प्रतिनिधी: राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमलीपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. यापुढे बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला .
अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत आहे, असे निर्दशनास आल्यास त्या कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकही मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर काढण्यात आले.
या अंतर्गत सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
सह आयुक्त (अन्न), सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांची तपासणी करावी. तसेच त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा व वितरण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी व प्रतिबंधित अन्नपदार्थांचे बंदीबाबत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

 

0000

संबंधित पोस्ट

वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर – पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाची भव्य सांगता मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची उपस्थिती

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! हिंदु जनजागृती समिती*आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ?

जिल्ह्यात 35 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र

vishwatmaklokswamivarta

पेण भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याच्या घटनेचेभूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्या मार्फत सर्वेक्षण..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन संपन्न

vishwatmaklokswamivarta