vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील आरोग्य सेवांमध्ये कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलसोबतच निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने कालबद्ध आराखडा तयार केला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.याबाबत सदस्य अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफसाठी नियमित उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून, बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सेवेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक गोष्टीची नोंदणी सक्तीने करण्यात येत असून, गैरप्रकार आढळल्यास चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. माढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेगाव येथील मुख्य इमारत व कर्मचारी निवास्थान इमारती जीर्ण झाल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यानुसार या आरोग्य संस्थेचे बांधकाम पाडण्यास हरकत नसल्याबाबत विभागीय अधीक्षक अभियंता (सा.बां.वि.) यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊन इमारत बांधकाम निर्लेखित करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. या आरोग्य संस्थेच्या जीर्ण इमारतींचे बांधकाम निर्लेखित करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी नवीन इमारत बांधकाम करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईत बिहार भवनला विरोध करण्याची राज ठाकरेंची भुमिका संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

एका लग्नाची गोष्ट’-अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

हा अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प…देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकार ची सर्वात मोठी कारवाई दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

11 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आदर्श आचारसंहिता लागूØ 4,76,855 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, नामनिर्देशनपत्र ऑनलाईन दाखल करावे लागणार 141 प्रभागातून 286 सदस्य निवडले जाणार;145स्त्रीयांसाठी राखीव, दुबार नाव असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणारØ आचारसंहितेसाठी 1950/1077 हेल्पलाईन नंबर जारी

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.