vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर 15 ते 19 जुलै या कालावधीत ड्राय डे घोषित*

जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर 15 ते 19 जुलै या कालावधीत ड्राय डे घोषित*

सातारा प्रतिनिधी  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील पालखी मार्गवरीलदारूची दुकाने दि.15 ते दि.19 जुलै, 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार पालखीच्या मार्गक्रमणानुसार खालीलप्रमाणे कोरडा दिवस (ड्राय डे) घोषित करण्यात आले आहेत.

 

 

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थावन, मार्गक्रमण व मुक्कामाच्या ठिकाणी व मुक्कामाच्या दिवशी सर्व प्रकारची दारूची दुकाने, देशी दारू किरकोळ विक्री (सीएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-3), विदेशी मद्यविक्री (एफएल-3) परवानाकक्ष (एफएल-3) बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकाने (टिडी-पुढील तारखांना विविध ठिकाणी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 15 जुलै रोजी पाडेगाव, बाळ पाटलांची वाडी, लोणंद शहर. दि.16 जुलै रोजी लोणंद शहर व परिसर (तसेच तरडगावला पालखी पोहोचेपर्यंत लोणंद बंद राहील). दि. 17 जुलै रोजी तरडगाव ते फलटण रस्त्यावरील व फलटण शहर व परिसर काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल., दि.18 जुलै रोजी फलटण ते बरड रस्त्यावरील व बरड, विडणी, पिंपरद, निंभळक फाटा., दि. 19 जुलै रोजी साधुबुवाचा ओढा, धर्मपूरी, बरड व राजुरी पानसकरवाडी (पालखी पुढे सोलापूर जिल्ह्यात जाईपर्यंत बंद). या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध (परवानाधारक) मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच दुकान बंद ठेवण्यात आलेल्या कालावधीसाठी कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

000

संबंधित पोस्ट

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत ६, ७ डिसेंबरला ‘ग्लोबल युथ फेस्टिव्हल २०२५

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी,पात्र विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी अंतिम संधी

vishwatmaklokswamivarta

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्वप्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी