vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदू जनजागृती समिती

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदू जनजागृती समिती

 राज्य प्रतिनिधी

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे; मात्र, कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या गर्भधारणेची तुलना भगवान श्रीकृष्णांच्या जन्माशी करण्यात आल्याचे अत्यंत वेदनादायी असून, त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

सदर आरोपी न्यायवस्थेचा अपमान करत सुमारे ४० दिवस फरार होती आणि तपासात सहकार्य करत नव्हती, असा आरोप आहे. नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक छळ, मानसिक छळ आणि सक्तीने धर्मांतर घडवून आणल्याचे गंभीर आरोप तिच्यावर आहेत. तसेच निष्पाप हिंदू महिला कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकणे आणि पीडित महिलांचा आवाज दडपण्याचेही आरोप या प्रकरणात आहेत. या सर्व गंभीर आरोपांवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

हिंदू धर्मग्रंथांनुसार, देवकीच्या आठव्या पुत्रामुळे आपला वध होईल, या भविष्यवाणीमुळे कंसाने निष्पाप देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात डांबले होते. त्यामुळे या प्रकरणाची तुलना भगवान श्रीकृष्णांच्या जन्माशी केल्याने नाशिक पोलिसांची अप्रत्यक्षपणे ‘कंसा’शी तुलना केली जात असल्याचा आभास निर्माण होतो. अशा प्रकारच्या धार्मिक उपमा टाळल्या पाहिजेत. त्यामुळे तपास यंत्रणेचे मनोबल खच्ची होऊ शकते आणि हिंदूंच्या श्रद्धाही दुखावल्या जाऊ शकतात.

याशिवाय, आरोपीला विशेष सवलत दिली जात असल्याचेही दिसून येते. एनसीआरबी (NCRB) च्या २०२४ च्या ‘प्रिझन स्टॅटिस्टिक्स’ अहवालानुसार, भारतातील एकूण कारागृहातील कैद्यांपैकी सुमारे ४.१ टक्के महिला कैदी आहेत. त्यापैकी १,५३७ महिला कैद्यांसोबत १,७६४ मुले कारागृहात राहत होती, तसेच अनेक पश्चिम बंगाल राज्यातच २०२४ च्या रिपोर्ट नुसार ४ वर्षांत ६२ महिला कैद्यांनी न्यायालयीन कोठडीत असतानाच बालकांना जन्म दिला आहे. मग या कॉर्पोरेट जिहादच्या प्रकरणात आरोपीला वेगळी आणि विशेष वागणूक का दिली जात आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत.

आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, न्यायव्यवस्थेचा आम्हाला पूर्ण आदर आहे. मात्र, न्यायालयीन निरीक्षणांमध्ये अशा धार्मिक तुलना टाळल्या गेल्या पाहिजेत, ज्यामुळे जनभावना दुखावल्या जातात किंवा अनावश्यक वाद निर्माण होतो.

या जामीन आदेशाचा महाराष्ट्र शासनाने कायदेशीर अभ्यास करून त्याला उच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी आमची मागणी आहे.

श्री. रमेश शिंदे ,

राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती(संपर्क: ९९८७९ ६६६६६)

 

• Scanned by Gmail

संबंधित पोस्ट

बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेला राज्यशासनाच्यावतीने गती-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

vishwatmaklokswamivarta