vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत दोन हजाराहून अधिक महिलांना लाभ -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे

कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत दोन हजाराहून अधिक महिलांना लाभ -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे

राज्य प्रतिनिधी-कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये एकूण १२ हजार ७१९ लाभार्थ्यांला लाभ देण्यात आला असून त्यापैकी २ हजार १८ महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यांना १४ कोटी ४७ लाख ८८ हजार रुपयाचे अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजने अंतर्गत ३ हजार २७० लाभार्थ्यां पैकी ३२७, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये ६ हजार ९६ लाभार्थ्यांपैकी १ हजार २१५ आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३ हजार ३५३ लाभार्थ्यांपैकी ४७६ महिला लाभार्थ्यांना असे एकूण महिला लाभार्थी आहेत.

केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (६०:४० केंद्रः राज्य) तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, विभागनिहाय पीकरचने नुसार गरजेनुरुप व मागणी प्रमाणे पूर्वतपासणी केलेली दर्जेदार कृषी औजारे अनुदानावर उपलब्ध करुन देणे, कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहीत करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहेत.

सन २०२०-२१ पासुन महाडीबीटी संकेतस्थळावर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. महिला, अनु.जाती, अनु.जमाती, अल्प व अत्यल्प भुधारक यांना ५० टक्के तर इतर लाभार्थ्यांना ४० टक्के अनुदान तसेच किसान ड्रोन खरेदीसाठी कृषि पदवीधर शेतकऱ्यांकरिता अनुदान दर ५० टक्के किंवा रु. ५ लाख व इतर शेतकऱ्यांकरिता अनुदान दर ४० टक्के किंवा ४ लाख यातील कमी असेल ती. सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी भांडवली खर्चाच्या अनुदानाचा दर ४० अनुदान रक्कम कमीत कमी रु. ४ लाख व जास्तीत जास्त रू. १ लाख देण्यात येते, अशी माहिती श्री. कोचोळे यांनी दिली आहे.

00000

संबंधित पोस्ट

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष लेख)-तंबाखूला नाही म्हणूया, आयुष्य सुंदर जगूया!”

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन-जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे सहभागाचे आवाहन

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासहनाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट