vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात या मागणीचे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले

जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात या मागणीचे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले

राज्य प्रतिनिधी-पोलीस अधिक्षक, जालना यांची मा.खा.डॉ.कल्याण काळे, मा.आ.अर्जुनराव खोतकर, मा.मंत्री राजेशभय्या टोपे, मा. आ. संतोष सांबरे, श्री राजाभाऊ देशमुख,श्री भास्करराव आंबेकर,श्री बबलूसेठ चौधरी, श्री अतिक खान, श्री रशिद पहिलवान, श्री बदरभाई चाऊस, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री विनीत सहानी, श्री संजयसेठ मुथा,श्री विष्णू पाचफुले, श्री कृष्णा पडूळ, श्री सोपानराव तिरुखे व इतर व्यापारी, नागरीकांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले सदर निवेदनात जालना शहर व जिल्ह्यातील नागरिकांच्या वाढत्या असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. मागील काही दिवसांपासून शहरात तसेच ग्रामीण भागात गुंडगिरी, चोरी, धमकावणे, व विनाकारण मारामाऱ्या अशा अनेक घटना घडत आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वसामान्य जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.

              रात्रौ

शिराच्या वेळेस रस्त्यावर बेकायदेशीरपणे फिरणारे संशयास्पद युवक, दुकानदारांना, व्यापारी वर्गाला,उद्योजकांना धमक्या देणे,खंडणी मागणे व त्यांच्यावर जीवघेणे हल्ला करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.तसेच काही भागात लुटमारीच्या घटना घडल्याची माहिती नागरिकांकडून वारंवार मिळत आहे. जालना शहरात प्रत्येक पंधरा दिवस ते महिन्याभरातून एखादी खुनाची घटना नियमितपणे घडत आहे. सदरील घटनांसाठी सर्रासपणे जीवघेणे शस्र व बंदुकींचा वापर केला जात आहे अशी शस्रे कुणाकडून व कशी उपलब्ध होतात या बाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा घटना थांबविण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे. जालना येथील नवीन मोंढा परिसरात व्यापारी,शेतकऱ्यांचा सतत राबता असतो व या ठिकाणी शेतमालाच्या पैशांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतो त्यामुळे येथे गुंड प्रवृत्तीचे लोक व्यापारी व शेतकऱ्यांना धमकावून वेळप्रसंगी जीवघेणा हल्ला करून लुटमार करतात यासाठी येथे एक पोलीस चौकी उभारण्यासाठी मागील १० ते १२ वर्षांपासून व्यापारी बांधव वारंवार निवेदने देऊन मागणी करत आहे परंतु यावरती आजपर्यंत कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

मागण्या:1. जालना शहर व जिल्ह्यात पोलिस गस्त व नाकाबंदी वाढवावी.2. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्यावर कठोर कलमे लावावीत.3. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता तपासून नियमितपणे निरीक्षण करावे.4. पोलिस पेट्रोलिंग वाहनांची संख्या वाढवून रात्रीच्या वेळी संवेदनशील भागात तैनाती करावी.5. नागरिकांसाठी “हेल्पलाइन” सक्रिय ठेवून तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी.   जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी अधिक्षक साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आश्वासन दिले. यावेळी चर्चा करताना खा.डॉ कल्याण काळे म्हणाले की, जर या बाबत लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर आम्ही पोलीस प्रशासन व सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा दिला

संबंधित पोस्ट

मुंबईत आता नोंदणी न केलेला भाडेकरार आता बेकायदेशीर-ऑनलाइन नोंदणी आवश्यक….

vishwatmaklokswamivarta

अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधीDGCA मान्यता प्राप्त प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी…

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,कठोर नियंत्रण, झूम वेबकास्ट व ड्रोन चित्रीकरणामुळे प्रशासनाचे यश पुढील सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय..

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर यांची नवी मुंबई महानगरपालिकेत आढावा बैठक…

vishwatmaklokswamivarta

३ महिने पाठपुरावा करूनही ‘एस्.टी.’चे ७२% संपर्क क्रमांक ‘डेड’ आता आश्वासन नको; संपर्क यंत्रणा सुरू करा -‘सुराज्य अभियान’मुंबई आणि नवी मुंबई येथे परिवहन महामंडळाना निवेदन..

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त नवी मुंबई खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल    -जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta