vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच-संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज आक्रोश मोर्चा…

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच-संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज आक्रोश मोर्चा…

 

राज्य प्रतिनिधी-

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे. बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव बंद राहणार आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गावातील सर्व दुकानं आणि आस्थापना बंद ठेवण्यात आली आहेत. मस्साजोग गावचे सर्व नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत.

संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग असणार आहे. दरम्यान, ठरवलं तर पाच मिनिटात वाल्मिक कराडला पकडून आणता येईल, पण मंत्र्यांसोबतच्या संबंधांमुळे कराड मोकाट आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपतीनी केला आहे. तसेच धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

मोर्च्यात कोण कोण सहभागी होणार?खा.बजरंग सोनवणे,आ.संदीप क्षीरसागर,आ प्रकाश सोळंके,आ.सुरेश धस,आ. जितेंद्र आव्हाड,अंजली दमानिया,मनोज जरांगे पाटील,छत्रपती संभाजी राजे भोसलेअंजली दमानिया यांचा धक्कादायक दावा-संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात फोन आल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीसांना माहिती दिल्याचही अंजली दमानियांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवालही यावेळी अंजली दमानियांनी उपस्थिती केला आहे.

कोण आहेत वाल्मिक कराड?वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात. यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे, तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मीक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे. सर्व पत्रकारांना माहिती देताना या सर्व आरोपाचा सत्तेतील मंत्री धनंजय मुंडे यांनी मला बदनाम करून षडयंत्र केले जात असल्याचा योजना चालवले असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली तसेच त्यांनी संबंधित खून प्रकरणात दाखल असलेल्या लोकांना फाशीवर लटकवण्यात यावे अशीही अशी माहिती पत्रकारांना दिली

संबंधित पोस्ट

एसटी’च्या आर्थिक सक्षमतेसाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य द्या– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

द्रमुक सरकार उलथवुन टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*   

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरiवणारेच संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये,लवकरात लवकर लागू करावेत कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक,एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta

वर्षा अखेर दुर्दैवी घटना मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले

vishwatmaklokswamivarta