vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन*

*आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन*

 

मुंबई, प्रतिनिधी: राज्यात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पूर्णपणे सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकटसमयी जाहीर केलेल्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी १०७० हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिक ०९३२१५८७१४३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ०२२-२२०२७९९० आणि ०२२-२२७९४२२९ या दूरध्वनी क्रमांकांवर देखील थेट संपर्क साधू शकतात. याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर जलद गतीने मदत कार्य राबवण्यासाठी आणि परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षही सज्ज ठेवण्यात आले आहेत, ज्यांचा मुख्य संपर्क क्रमांक १०७७ असा आहे, असेही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

 दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील क्षेत्रांतील नागरिकांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी अजिबात न घाबरता या जाहीर केलेल्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधून प्रशासकीय यंत्रणेची मदत घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री पीक विमा योजना १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी * शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन * जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स अधिकृत विमा कंपनी

जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर-– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार कृत्रिम बुद्धिमत्तेतील शिक्षणाकडे आपल्या सभोवतालच्या जगाशी जोडलेले मूलभूत सार्वत्रिक कौशल्य म्हणून पाहिले जावे – सचिव, शालेय शिक्षण

vishwatmaklokswamivarta

जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे दिमाखदार आयोजन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत 23 ते 25 मार्च रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन