vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण 34 टक्के भरले महाबळेश्वर महसूल मंडळात 393 मि.मी. पाऊस- जिल्हाधिकारी संतोष पाटील

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण 34 टक्के भरले महाबळेश्वर महसूल मंडळात 393 मि.मी. पाऊस- जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

सातारा, प्रतिनिधी: सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्रा भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता 105.25 टीएमसी असून यामध्ये 7 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण 33.93 टक्के भरले असून धरणातील आवक 93 हजार क्युसेक्सने होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

7 जुलै अखेर जिल्ह्यात 288.7 मि.मी. पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. 7 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात 22 महसूल मंडळांमध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. यामध्ये महाबळेश्वर महसूल मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजेच 392.8 मि.मी. पाऊस झाला आहे. त्या खालोखाल लामज, बामणोली, तापोळा या महसूली मंडळांमध्ये 169 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वाठार 148.5 मि.मी., करहर आणि केळघर या दोन ठिकाणी 124.5 मि.मी., पाचगणी 136.5 मि.मी., पसरणी 110.3 मिमी., पाटण 100.5 मि.मी.,

महाबळेश्वर तालुक्यातील नावली येथील 7, धावली येथील 17 आणि रुळे येथील 8 अशा एकूण 32, जावली तालुक्यातील बहुले येथील 23 आणि बोंडारवाडी येथील 8 अशा 31, वाई तालुक्यातील जांभळी येथील 22 आणि डोईचीवाडी येथील 5 नागरिकांचे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नातेवाईक, मंदिरे आदी सुरक्षीत ठिकाणी तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे.

पाटण तालुक्यातील 39, सातारा तालुक्यातील 9, खंडाळा तालुक्यातील 2, जावली तालुक्यातील 11, वाई तालुक्यातील 13, महाबळेश्वर तालुक्यातील 9 अशा 83 घरांची पडझड झाली आहे. या घरांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सातारा तालुक्यातील केरी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडाल्यामुळे तर खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील प्राथमिक शाळा व स्मशानभूमीचे भिंत पडून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सखोल भागात पाण्या साचणाऱ्या, धबबधेच्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती पुढील प्रमाणे. आजचा एकूण पाणीसाठा, कंसात प्रकल्पीय एकूण क्षमता टीएमसीमध्ये आणि आजची एकूण टक्केवारी.

कोयना – 35.71 टीएमसी (105.25 टीएमसी,) टक्केवारी 33.93 टक्के, धोम – 6.59 टीएमसी (13.5 टीएमसी,) टक्केवारी 48.81 टक्के, धोम-बलकवडी- 2.17 टीएमसी (4.08 टीएमसी,) टक्केवारी 53.19 टक्के, कण्हेर – 6.29 टीएमसी (10.10 टीएमसी,) टक्केवारी 62.28 टक्के, उरमोडी – 4.50 टीएमसी (9.96 टीएमसी,) टक्केवारी 45.18 टक्के, तारळी – 1.73 टीएमसी (5.85 टीएमसी,) टक्केवारी 29.57 टक्के.

पावसामुळे झाड कोसळने, दरड कोसळने, रस्ता खचणे असे प्रकार होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अशा वेळी यंत्रणांनी सजग राहून तात्काळ कार्यवाही करावी व रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत. धोकादाय ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रांमध्ये नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देत तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होणाऱ्या मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टोरंटस आणि बार इत्यादी आस्थापनांमध्ये आगीपासून बचावासाठी पुरेशा उपाययोजना आहेत किंवा नाहीत याची तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबवत आहे

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलचे तसेच ‘आला रे आला… राज्य महोत्सव आला…’ या गीताचे लोकार्पण

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- खा. श्रीरंग बारणे दिशा’ समितीची बैठक संपन्न