केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी..
नवी दिल्ली, प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -2025 मध्ये देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात राज्यातील 60 हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष 2025 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. ऋषीकेश आलासे 61 ,आकाश त्रिवेदी यांनी 73, गौरव चोपडा यांनी 83, सायली पगार यांनी 87, वा तर दिक्षा पाटकर यांनी 88 वा क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी ऑगस्ट 2025 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. डिसेंबर 2025- फेब्रुवारी 2026 दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 958 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –317, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 104, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 306, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 158, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 73 उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 258 उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 129, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 26, इतर मागास वर्ग -86, अनुसूचित जाती- 08, अनुसूचित जमाती – 06 उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण तीन दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहेया रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू,भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 74, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 18इतर मागास वर्ग (ओबीसी) –47, अनुसूचित जाती (एससी) – 28, अनुसूचित जमाती (एसटी) 13 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.
भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण – 55 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 22, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 6, इतर मागास वर्ग (ओबीसी) – 15, अनुसूचित जाती (एससी) – 8, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 4 जागा रिक्त आहेत.
भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – 150 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 15, इतर मागास प्रवर्गातून – 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 22, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 11 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 507 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 211, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 48 , इतर मागास प्रवर्गातून -141, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 73 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –34 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.
केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 195 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 79, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 17 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 61, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 27 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -11 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
एकूण 348 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेलअधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.