vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्याच्या बांधावर जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी 

शेतकऱ्याच्या बांधावर जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी

    जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी गाव परिसरात शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्यक्ष जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे उभी पिके जमिनदोस्त झाली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी जनार्धन मात्रे यांच्याशी संवाद साधत झालेल्या पिक नुकसानीची माहिती जाणून घेतली. शासन नुकसानग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून काळजी करु नका अशा शब्दांत बाधित शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी तुर, कापुस व सोयाबीन या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच अतिवृष्टीने बाधित पिकाने अतोनात नुकसान झाले असून शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे मत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी आमदार नारायण कुचे, भाऊसाहेब घुगे, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, नायब तहसीलदार श्री. राजमाने यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली जालना शहरातील विविध भागात पाहणी

  मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल‍ येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जालना शहरातील महापालिकेसमोरील परिसरातील शिवशक्ती ग्रीन सिटीत अतिवृष्टीने सखल भागात पावसाचे पाणी साचलेल्या भागातील रहिवासी भेट घेवून विचारपूस केली तसेच रेल्वे स्थानकाशेजारील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील घरामध्ये पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली. अतिवृष्टीने घरांचे खुप मोठे नुकसान होवून घरात पाणी शिरले आहे. या संकटात सापडलेल्या रहिवाशांना अन्न व इतर आवश्यक बाबी पुरविण्याबाबत जिल्हा प्रशासनाला नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय माहिती व जनसंपर्क महासंचालनालय असणार समन्वय संस्था (नोडल एजन्सी)

जिल्ह्यातील तापमानात वाढ उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आत्ताची मोठी बातमी 🚍 राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बससेवा आता फक्त मुंबई–पुणे नव्हे, तर नाशिक–पुणे, पुणे–कोल्हापूर, नागपूर–अमरावती, पुणे–सोलापूरसारख्या मार्गांवरही लवकर सुरू होणार!

vishwatmaklokswamivarta

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प- व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड

राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार-शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प…

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सुविधा