vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त* *जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून शिबीरांचे आयोजन*

*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त* *जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून शिबीरांचे आयोजन*

सातारा प्रतिनिधी: राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा या कार्यालयामार्फत विविध शिबीरांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.सर्व मागासवर्गीय, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग प्रवर्गातील पालकांनी आपल्या पाल्याचे जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान अभ्यासक्रम व पदविका (तृतीय वर्ष अभ्यासक्रमात) शिकत असताना प्राप्त करणेकामी योग्य कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव तयार करून आपल्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत समितीस सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य उमेश घुले यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी समितीस प्रस्ताव सादर केले आहेत परंतु अद्याप त्रुटींची पुर्तता केली नसल्याने प्रकरण प्रलंबित आहे अशा सर्व त्रुटीयुक्त प्रस्तावधारक यांनी समिती कार्यालयास सर्व आवश्यक मुळ कागदपत्रांसह दि. २२ सप्टेंबर ते दि. २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये समक्ष उपस्थित राहून त्रुटींची पुर्तता करावी जेणेकरून समितीस आपले प्रस्तावावर विहित कालमर्यादेत कागदोपत्री पुराव्यांच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेता येईल.

0000

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

बीड जिल्ह्यातील  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल –

विधानपरिषद अर्धा तास चर्चा-महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढविली जाईल- मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी-राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश 

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta