vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एल्डर लाईन” १४५६७ – ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार / जेष्ठ नागरिकांसाठी १४५६७ राष्ट्रीय हेल्प लाईन  

एल्डर लाईन” १४५६७ – ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार / जेष्ठ नागरिकांसाठी १४५६७ राष्ट्रीय हेल्प लाईन

राज्य प्रतिनिधी-सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने जेष्ठ नागरिकांसाठी १४५६७ राट्रीय हेल्प लाईन ही सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशाषित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते. “मानवसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा (MD) यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फौन्डेशन पुणे गेली ३७ वर्षापासून सातत्याने आपल्या विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृध्य, अपंग, निराधार, गरीब मुले मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत. जनसेवा फाउंडेशनला सयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.

महाराष्ट्रातील अंमलबजावणी: ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या या १४५६७ राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स आले असून, ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.

 हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवा: • माहिती : आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, याबाबत माहिती. • मार्गदर्शन : कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७. • भावनिक आधार – मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन.• बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलिस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशन” एल्डर लाईन १४५६७” ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरणाबाबतीत कोणतीही तडजोड नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

विधानभवन हाय अलर्टवर: खलिस्तान आतंकवादी यांच्या  धमकीच्या ईमेलनंतर परिसरात सुरक्षा कडक!

जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा…

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन· गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध· अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने· राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही· समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई· अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta