vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण: अमृत आणि एमसीईडीचा संयुक्त उपक्रम

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण: अमृत आणि एमसीईडीचा संयुक्त उपक्रम

 

     अमरावती, प्रतिनिधी: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन महत्त्वपूर्ण मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नवउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे आहे.

  पहिला कार्यक्रम १८ दिवसांचा अन्न व फळ प्रक्रिया निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण असून, दुसरा ३० दिवसांचा AI तंत्रज्ञानावर आधारित तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या दोन्ही प्रशिक्षणांमध्ये मोफत शिक्षण, अनुदान, आर्थिक सहाय्य आणि उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन पुरवले जाईल. याव्यतिरिक्त, ‘अमृत’ व्याज परतावा योजनेबाबतही सखोल माहिती दिली जाणार आहे.

     या प्रशिक्षणासाठी १८ ते ६० वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. विशेषतः ब्राह्मण, कायस्थ, ठाकूर, मारवाडी, गुजराती, जाट, राजपूत यांसारख्या अमृत लक्षित गटातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल

     या संदर्भात एक दिवसीय परिचय मेळावा आणि मुलाखत २६ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १२ ते ३ या वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पहिला माळा, टांक चेंबर्स बिल्डिंग, गाडगेनगर, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह (टी.सी., मार्कशीट, पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाइल, फोटो इत्यादी) मुलाखतीस उपस्थित राहावे.

    नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर, २०२५ आहे. अधिक माहितीसाठी स्वप्नील इसळ (८७८८६०४२२६), राजेश सुने (९१६८६६७१५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना अमरावती जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

संबंधित पोस्ट

मेळघाटातील मनरेगा मजुरांच्या खात्यात 28 कोटी जमा…

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘राह-वीर’ रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यायोजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गततीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

वाचन प्रेरणा दिवस,वाचक हेच वाचन संस्कृतीचे रक्षक- डॉ. मिलिंद दुसाने

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेचा उपक्रम; ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विशेष ट्रेनचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन