vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गततीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गततीन दिवसीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

जालना, प्रतिनिधी):- जालनातील पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांच्या हाताला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भारत सरकारच्या ‘एमएसएमई’ मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रदर्शन व विक्री’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुना जालना भागातील मस्तगढ येथील शितल गार्डन येथे दि.25 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान हे प्रदर्शन भरणार असून यात 50 हून अधिक वैविध्यपूर्ण स्टॉल्सचे आकर्षण असणार आहे. तरी स्थानिक कारागिरांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन एमएसएमई विकास कार्यालयाचे सहायक संचालक राहुलकुमार मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

प्रदर्शन विक्रीचे उदघाटन बुधवार, दि.25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 5 वाजता शितल गार्डन जालना येथे महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., एमएसएमई विकास कार्यालयाचे सहायक संचालक राहुलकुमार मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांचे मार्गदर्शनही मिळणार आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पादनांना थेट व्यासपीठ मिळवून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये सुतार, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई, झाडू आणि खेळणी निर्माते अशा विविध 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना आपली कला सादर करण्याची आणि वस्तूंची थेट विक्री करण्याची नि:शुल्क संधी देण्यात आली आहे. केवळ विक्रीच नव्हे, तर उद्योजकांना तांत्रिक बळ देण्यासाठी या तीन दिवसांत ब्रँड नोंदणी आणि बौद्धिक संपदा या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. तसेच 26 फेब्रुवारी रोजी स्वयंरोजगार कार्यशाळा आणि संध्याकाळी ‘संगीत संध्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद नागरिकांना घेता येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तीन दिवसीय प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य राहणार आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, खादी व ग्रामोद्योग अधिकारी बी. के. वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. या उपक्रमाला लघु उद्योग भारती आणि दलित भारतीय वाणिज्य एवं उद्योग चेंबर (डिक्की), भीम उद्योग अभियान, अखिल भारतीय व्यापारी परिसंघ जालना ईकाईसह विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत,तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता; पुढील संमेलन नाशिकला..

vishwatmaklokswamivarta

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा चौकशी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन

जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, 2 नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

vishwatmaklokswamivarta

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर मुरूम येथे मतदारसंघस्तरीय ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबीर

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण1 फेब्रुवारी 2026 रोजी आपला सलग नववा केंद्रीय बजेट संसदेत सकाळी 11 वाजता सादर करणार

vishwatmaklokswamivarta