vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे. तर बीड २४ मिमी, जालना १३.९ मिमी, सोलापूर १२.१ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज ३० मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- रायगड ०.३, रत्नागिरी ३.९, सिंधुदुर्ग ११.२, पालघर ०.१, नाशिक ०.६, धुळे ०.४, जळगाव ०.१, अहिल्यानगर ०.५, सोलापूर १२.१, सातारा १, सांगली ०.९, कोल्हापूर ०.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना १३.९,

बीड २४, लातूर ५.१, धाराशिव ४२.२, नांदेड ९.३, परभणी ३, हिंगोली ०.२, बुलढाणा २.२, अकोला ०.१, वाशिम ०.२, अमरावती ३.४, यवतमाळ ६.५, वर्धा ८.७, नागपूर १.४, भंडारा ०.७, गोंदिया ३.९, चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली २.५.

धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष’धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले. मात्र पावसामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

आंबोली घाट मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू

सिधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात रस्त्यावर दरड कोसळली राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने रस्त्यावरील कोसळलेली दरड हटवली असून या मार्गावर वाहतूक सुरळीतपणे चालू आहे. इंडो अमाइनस कंपनीतील वायू गळती बंद

महाड येथील इंडो अमाइनस या कंपनीमध्ये वायू गळतीमुळे एक कामगार जखमी झाला आहे. सध्या वायू गळती बंद असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.नांक २९ मे २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यात रस्ता अपघात घटनेत एक व्यक्ती, नांदेड जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्ती मृत झाल्या आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात भिंत पडून चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूरपरिस्थिती उद्भवलेली नाही. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सर्व जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.

संबंधित पोस्ट

बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’चा यशस्वी समारोप-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या आयोजनाने पुण्याचे नाव जगभरात पोहोचले- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

vishwatmaklokswamivarta

कसनसूर फळ रोपवाटिका बनणार आदर्श केंद्र – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा आढावा दुर्गम भागातही फळबाग हब साकारण्याचा प्रयत्न, जिल्हा प्रशासनाचा पुढाकार..

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

वनविभागापुढील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून वनसंपदेचे रक्षण करा – प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या दुसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा*१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी..