vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून जड मशिनरी वाहतुकीसाठी वाहतूक बंदीचा आदेश जारी 

रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून जड मशिनरी वाहतुकीसाठी वाहतूक बंदीचा आदेश जारी

अलिबाग, प्रतिनिधी – गेल (गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) उसर, ता. अलिबाग येथे मोठ्या आकाराच्या मशिनरीच्या वाहतुकीसाठी रायगड जिल्हाधिकारी यांनी काही मार्गांवरील सर्वसामान्य वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार, Premier Transport Limited ही कंपनी गेल कंपनीसाठी आवश्यक असलेली अवजड मशिनरी वाहून नेणार आहे. या मशिनरीचे माप अंदाजे ११,०४० मिमी लांब, ५,५५० मिमी रुंद आणि ५,२१० मिमी उंच असून, ही वाहतूक

कल्याण- तळोजा- कळंबोली- पेण- नागोठणे- पेझारी -अलिबाग- कुरूळ- उसर या मार्गावरून केली जाणार आहे.वाहतूक अधिक प्रभावीपणे पार पडावी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी दि. ३० मे २०२५ रोजी मध्यरात्री १२:०१ वाजल्यापासून सकाळी ६:०० वाजेपर्यंत ही वाहतूक करण्यात येणार आहे.

ही वाहतूक करताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशिष्ट ठिकाणी सेल (CARGO) बाजूला घेऊन इतर वाहने सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, जिल्हा वाहतूक शाखेमार्फत योग्य बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

सदर सेल (CARGO) ची उंची जास्त असल्यामुळे महाराष्ट्र विद्युत मंडळ (MSEB) कडून कर्मचारी उपस्थित राहून आवश्यक तेथे विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत कंपनीकडून लेखी पत्र प्राप्त झाले आहे.पावसाळा सुरु झाल्यामुळे ही वाहतूक टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, नागोठणे-शिहू-कुडूस-चिखलीगाव मार्गे पेझारी चेकपोस्ट, कार्ले खिंड, अलिबाग, कुरुळ, बेलकडे मार्गे गेल कंपनी, उसर येथे ही वाहतूक पोहोचवली जाईल.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रायगड यांनी वाहतूक नियमनाच्या दृष्टीने दिनांक ३० मे २०२५ रोजी मध्यरात्री १२:०१ वाजल्यापासून सकाळी ६:०० वाजेपर्यंत वरील मार्गांवरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद राहील, असा आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला आहे.

संबंधित पोस्ट

महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र वेरूळ येथे महास्वच्छता अभियान….

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात अवयवदान पंधरवड्याला सुरुवातØ अवयवदान जनजागृती रॅलीला उत्सफूर्त प्रतिसाद

महिला व बाल विकास कार्यालयाकडून तयार केलेल्यानारीबलम पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

नांदेड महानगरपालिकेची खडकपुरा-वाघी रोडवर मोठी कारवाई; अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल*

डॉल्बी चालकांनो ध्वनी मर्यादेचे पालन कर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी- पालकमंत्री शंभूराज देसाई

कर्जत व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी-महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे संचालक (पणन) यांना निर्देश