vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

महाड, प्रतिनिधी (रायगड जिमाका): वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया दि. १५ मे २०२५ पासून Online पद्धतीने सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्कृष्ट संधी असून, व्यवसायाधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या दृष्टीने एक भक्कम पाऊल पुढे टाकण्याचा मार्ग खुला झाला आहे.

प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून, अधिकृत माहितीपुस्तिका आणि अर्ज Online पद्धतीने www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

१० वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज सादर करून जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जाची निश्चिती करणे आवश्यक आहे. त्यानंतर व्यवसाय पसंती निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

प्रवेश घेतलेल्या पात्र प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ₹५०० विद्यावेतन दिले जाणार आहे. शिवाय, इ. १० वी व १२ वी समकक्षतेची सोय तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश घेण्याची संधीही उपलब्ध आहे.

उपलब्ध अभ्यासक्रम व जागा:

एक वर्ष कालावधीसाठी:
संघाता (Welder) – ४० जागा
विजतंत्री (Electrician) – २० जागा

दोन वर्ष कालावधीसाठी:
जोडारी (Fitter) – २० जागा
कातारी (Turner) – २० जागा
यंत्रकारागिर (Machinist) – २० जागा
यांत्रिक मोटारगाडी (Mechanic Motor Vehicle) – २४ जागा
तारतंत्री (Wireman) – २० जागा
अटेंडन्ट ऑपरेटर केमिकल प्लँट (AOCP) – ४८ जागा
मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लँट (MMCP) – ४० जागा
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लँट (IMCP) – २० जागा

शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना त्वरीत रोजगार, स्वयंरोजगार किंवा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी  http://www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
000

महाड, प्रतिनिधी: वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया दि. १५ मे २०२५ पासून Online पद्धतीने सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्कृष्ट संधी असून, व्यवसायाधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या दृष्टीने एक भक्कम पाऊल पुढे टाकण्याचा मार्ग खुला झाला आहे.

प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून, अधिकृत माहितीपुस्तिका आणि अर्ज Online पद्धतीने www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

१० वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज सादर करून जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जाची निश्चिती करणे आवश्यक आहे. त्यानंतर व्यवसाय पसंती निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.प्रवेश घेतलेल्या पात्र प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा ₹५०० विद्यावेतन दिले जाणार आहे. शिवाय, इ. १० वी व १२ वी समकक्षतेची सोय तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश घेण्याची संधीही उपलब्ध आहे.उपलब्ध अभ्यासक्रम व जागा:एक वर्ष कालावधीसाठी:

संघाता (Welder) – ४० जागा

विजतंत्री (Electrician) – २० जागा

दोन वर्ष कालावधीसाठी:

जोडारी (Fitter) – २० जागा

कातारी (Turner) – २० जागा यंत्रकारागिर (Machinist) – २० जागा यांत्रिक मोटारगाडी (Mechanic Motor Vehicle) – २४ जाग,तारतंत्री (Wireman) – २० जागा

अटेंडन्ट ऑपरेटर केमिकल प्लँट (AOCP) – ४८ जागा

मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लँट (MMCP) – ४० जागा

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लँट (IMCP) – २० जागा शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना त्वरीत रोजगार, स्वयंरोजगार किंवा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी  http://www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

000

संबंधित पोस्ट

राज्यासह मुंबई, ठाण्यात गुढीपाडवा शोभा यात्रेला दिमाखात सुरुवात

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता…

रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास प्रक्रियेत रियल ईस्टेट क्षेत्राचा सहभाग महत्वाचा

केंद्रीय राज्यमं त्री रामदास आठवले यांचा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार दौरा*  

अक्कलकुवा तालुक्यात केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय-विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षित मार्ग..

अंमली पदार्थाच्या गैरवापराविरुद्ध 18 ऑगस्टला जालना येथे राष्ट्रीय शपथ