vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता…

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता…

राज्य प्रतिनिधी

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात यादरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी #गारपीट होऊ शकते.

१९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाची व्याप्ती वाढण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. तथापि, २२ तारखेला वादळी पावसाची व्याप्ती आणि त्याचा प्रभाव कमी होईल.

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी 👇🏾⏺️ शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत.⏺️ ⁠काढणी केलेली #पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत.⏺️ ⁠वादळी वारे, #पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.⏺️ ⁠#शेतमाल, #भाजीपाला व इतर काढणी केलेली उत्पादने उघड्यावर ठेवू नयेत.

00000

संबंधित पोस्ट

वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रमांतर्गत तीर्थक्षेत्रातील सेवांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नाशिक कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी हजारो तरुण राहणार कार्यरत…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…

इंडिया पोस्ट फोरमची बैठक संपन्न

सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta