vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा रुग्णालयात अवयवदान पंधरवड्याला सुरुवातØ अवयवदान जनजागृती रॅलीला उत्सफूर्त प्रतिसाद

जिल्हा रुग्णालयात अवयवदान पंधरवड्याला सुरुवातØ अवयवदान जनजागृती रॅलीला उत्सफूर्त प्रतिसाद

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 3 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अवयवदान जनजागृती पंधरवडा राबविण्यास सुरुवात झाली असून भव्य रॅलीने या पंधरवड्याचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. “अंगदान जीवन संजीवनी” या अभियानांतर्गत आयोजित या रॅलीस शहरवासीयांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमाचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अवयवदानाविषयी समाजात जनजागृती निर्माण व्हावी, अंगदानाच्या महत्त्वाविषयी नागरिकांमध्ये समज वाढावी व गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली होती.

अवयवदान जनजागृती पंधरवड्यात हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे, डोळे, ऊती यांसारख्या अवयवांचे दान हे दुसऱ्याचे जीवन वाचवू शकते, “अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान” या उद्देशाने सर्व नागरिकांनी अवयवदानासाठी संमती फॉर्म भरुन अवयवदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंगदानाची शपथ देण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या रॅलीमध्ये नर्सिंग अधिकारी प्राचार्य खेडेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धोंगटे, नेत्रतज्ञ डॉ. साईनाथ तोडकर, तसेच नेत्र विभागातील सर्व कर्मचारी, अधिसेविका, मेट्रन व इतर आरोग्य कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग घेतला.0000

 

संबंधित पोस्ट

मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी खुशखबर- महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली, गो अर्ली ही सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानपरिषदेत केली.

शिराळा, चांदोलीसाठी सर्वसमावेशक पर्यटन आराखडा तयार करा  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत शाळा प्रवेशोत्सव झाला आनंदोत्सव

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय-आरोपीला फाशीची शिक्षा,बालहक्क संरक्षण आयोगाकडून निर्णयाचे स्वागत!सबळ पुरावे, जलद तपास आणि प्रभावी न्यायालयीन मांडणीमुळे ऐतिहासिक निकाल.बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा : डॉ. संजय लाखेपाटील

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवरआर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी- मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान …

vishwatmaklokswamivarta