vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

            सांगली, प्रतिनिधी: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक 21 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आलेली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

  राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकिय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या भटक्या जमाती – क धनगर प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न रक्कम 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष रक्कम 43 हजार रूपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष रक्कम 38 हजार रूपये प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.

    या योजनेंतर्गत B.A., B.Com., B.Sc. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि M.A., M.Sc. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांकरिता ऑनलाईन अर्ज दि. 17 ऑगस्ट 2025 पर्यंत hmas.mahait.org या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात दि. 18 ऑगस्ट 2025 पर्यंत जमा करणे बंधनकारक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले..

vishwatmaklokswamivarta

योजना सामाजिक न्यायाच्या’ जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुस्तिकेचे विमोचन

सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम !अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्‍बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ समृध्‍द लोकशाहीसाठी आश्‍वासक बाब…

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी-प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta