vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हा परिषद उपकरातंर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना;प्रस्ताव मागविले

जिल्हा परिषद उपकरातंर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना;प्रस्ताव मागविले

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या उपकरांतून मागासवर्गीय घटक व दिव्यांग घटक यांच्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी कळविले आहे.

 जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या किमान 20 टक्के रक्कम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्धांसाठी आणि 5 टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद 20 % उपकरातून मागासवर्गीयांसाठी व 5 % उपकरातून दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्याकरीता 2025-26 या आर्थिक वर्षात पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव दि. 15 जुलै पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी केले आहे.

 20 % उपकरातील योजनेचे नाव मागासवर्गींयाना संगणक, लॅपटॉप पुरविणे, प्रति लाभार्थी अनुदान रु.42000/-, मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे प्रति लाभार्थी अनुदान रु.43070/-, मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे प्रति लाभार्थी अनुदान रु.43070/-, मागासवर्गींयाना कडबा कुट्टी यंत्र पुरविणे प्रति लाभार्थी अनुदान रु.29000/-, मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीन पुरविणे प्रति लाभार्थी अनुदान रु.9300/-, मागासवर्गीय दुग्ध व्यवसायासाठी गाय, म्हैस पुरवठा करीता अर्थसहाय्य देणे प्रति लाभार्थी अनुदान रु.40000/-, मागासवर्गींयाना मिरची कांडप यंत्र (पल्वालायाजर) पुरविणे प्रति लाभार्थी अनुदान रु. 20000/-, मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरविणे प्रति लाभार्थी अनुदान रु.25000/-, जि.प.शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थींनीना सायकल वाटप प्रति लाभार्थी अनुदान रु.3500/-, मागासवर्गीय इलेक्ट्रिक मोटर संच पुरविणे प्रति लाभार्थी अनुदान रु.20000/-, मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलर संच पुरविणे प्रति लाभार्थी अनुदान रु.21900/-, मागासवर्गीय लाभार्थ्यांना पिठाची गिरणी पुरविणे प्रति लाभार्थी अनुदान रु.23500/-

 सर्व साधारण अटी व शर्ती,अर्जदार हा अनुसूचित जाती (S.C.) अनुसूचित जमाती (S.T.) विमुक्त जाती व भटक्या जमाती (V.J.N.T.) विशेष मागास प्रवर्ग (S.B.C.) व नवबौद्ध या घटकांतील असावा. संगणक योजनेचा अर्जदार 12 वी उत्तीर्ण व एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्रधारक असावा. पिको फॉल शिलाई मशीन या योजणेकरीता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे. प्रत्येक योजनेकरीता उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, तहसिल कार्यालयाचे असावे, ज्या योजनेकरीता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरीता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे, शेती उपयोगी साहित्याकरीता लाभार्थ्याकउे शेती असल्याचा पुरावा आवश्यक आहे.

 5% उपकरातील दिव्यांगासाठीचे योजना दिव्यांग व्यक्तीना विनाअट घरकुल देण्याची योजना प्रति लाभार्थी देय अनुदान रुपये 1 लक्ष 20 हजार, निराधार, निराश्रीत अतितीव्र दिव्यांगाना विनाअट निवाई भत्ता, प्रति लाभार्थी देय अनुदान रुपये रुपये 10000/-, अस्थिव्यंग व्यक्तीना स्वंयचलित तीनचाकी सायकल (स्कूटर विथ ॲडाप्शन) डिव्हायसेस फॉर डेली लिव्हींग इ. प्रति लाभार्थी देय अनुदान रुपये 1 लक्ष 5000/-

सर्व साधारण अटी व शर्ती-40 % किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतचे युडीआयडी प्रमाणपत्र, तहसिलदार यांनी दिलेले अधिवास, रहिवासी प्रमाणपत्र, यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, घरकुलासाठी 8 अ उतारा, अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा, तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्न दाखला, स्कुटर विथ ॲडप्शन चालविणेकरीता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना, स्थायी अर्हक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.00000

संबंधित पोस्ट

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठीvनागरिकांना प्रोत्साहित करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन

परिवर्तनवादी गीते, प्रबोधनात्मक व्याख्यान.. यंदाची भीमजयंती ठरणार विचारांचा महोत्सव! सार्वजनिक जयंती उत्सव समितीची जय्यत तयारी; अध्यक्ष निलेश राऊत यांची माहिती …

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे राणीउंचेगाव येथे एकदिवसीय शेतकरी मेळावा संपन्न

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी‘धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’

मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित,जात पडताळणीची १६ हजार ११० प्रकरणे निकाली ; एसईबीसीची २ लाख ९५ हजार ३०५ प्रमाणपत्रे वितरित

vishwatmaklokswamivarta