vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2026-27 साठी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन रब्बी पिकांसाठी 15 डिसेंबर अंतिम मुदत

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2026-27 साठी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन रब्बी पिकांसाठी 15 डिसेंबर अंतिम मुदत

अमरावती, प्रतिनिधी: रब्बी हंगाम २०२६-२७ करिता पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा उतरविण्यास सुरुवात झाली असून १५ डिसेंबर २०२६ पर्यंत रब्बी गहू,हरभरा आणि कांदा पिकांचा विमा काढून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

     अमरावती जिल्ह्यासाठी इफ्को-टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली असून नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत रब्बी गहू, हरभरा व रब्बी कांदा या पिकांसाठी विमा उतरवण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२६ आहे, तर उन्हाळी भुईमूग पिकासाठी ३१ मार्च २०२७ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. गहू पिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ४५ हजार रूपये असून हप्त्या पोटी प्रति हेक्टरी ४५० रुपयांनुसार पैसे भरावे लागणार आहेत. हरभऱ्यासाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम असून प्रति हेक्टरी ३६० रुपये विमा हप्ता येणार आहे. रब्बी कांद्यासाठी ८२ हजार रुपये प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम असून प्रति हेक्टरी १ हजार ६४० रुपये विमा हप्ता येणार आहे. तर उन्हाळी भूईमुग पिकासाठी ४० हजार ६०० रुपये प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम असून प्रति हेक्टरी ४०६ रुपये विमा हप्ता येणार आहे.

      विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य आहे. तसेच नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ अंतर्गत पिकांची नोंद असणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, ७/१२ व ८अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि स्वयं घोषणा पत्र ही कागदपत्रे जोडावीलागणार आहे. सी.एस.सी केंद्रांमार्फत अर्ज करताना निश्चित करण्यात आलेल्या विमा संरक्षित रकमेपेक्षा अतिरिक्त पैसे घेतल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयाकडे तक्रार करावी. शेवटच्या दिवसांत पोर्टलवर तांत्रिक लोड येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी जवळच्या सी.एस.सी केंद्राशी संपर्क साधून वेळेत आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा असे सांगण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

कोरेगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ*- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार*

vishwatmaklokswamivarta

कुणबी प्रमाणपत्रांसाठी हिंगोली जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांत विशेष शिबिरे १० ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजन; १३ हजार ७१३ अर्जांपैकी १३ हजार ७०७ मंजूर

vishwatmaklokswamivarta

चौकशी अहवालातील ‘एमपीएससी’ अधिकाऱ्यांचा उल्लेख अनावधानाने; पोलिसांकडून स्पष्टीकरण .

vishwatmaklokswamivarta

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन