vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीयएकतादिन आणि भारत पर्वानिमित्त गुजरातमधील #केवडिया (एकतानगर) येथे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित उपक्रमात महाराष्ट्र #पर्यटन विभाग सहभागी होणार

#राष्ट्रीयएकतादिन आणि भारत पर्वानिमित्त गुजरातमधील #केवडिया (एकतानगर) येथे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित उपक्रमात महाराष्ट्र #पर्यटन विभाग सहभागी होणार आहे. यावेळी उभारण्यात येणाऱ्या विशेष पर्यटन दालनातून राज्यातील गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक व निसर्गरम्य स्थळे, साहसी आणि ग्रामीण पर्यटनासह महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा देशभरातील पर्यटकांसमोर मांडण्यात येणार आहे.

राज्य प्रतिनिधी

दालनात पैठणी विणकामाचे प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ, पारंपरिक हस्तकला, पर्यटनविषयक माहितीपत्रके आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही प्रमुख आकर्षणे असतील. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या किचन स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पर्यटन विभागाचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उपसंचालक विजय जाधव उपस्थित राहणार आहेत.

पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव यांनी सांगितले की, विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख करून देणे आणि विविधतेतील एकतेची भावना दृढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि पर्यटनातील संधी देशभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविता येतीलपर्यटन संचलनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या पर्यटनवैविध्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी मांडणी केल्यास राज्याला अधिक पर्यटक आकर्षित करता येतील. या उपक्रमामुळे राज्यातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक कला व खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासह गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास चालना मिळेल.

संबंधित पोस्ट

⚖️🚨 *परवान्याचा गैरवापर; जनबंधू स्केल सर्व्हिसेसचा विक्री परवाना निलंबित* 🚨⚖️📍 *वैध मापन शास्त्र विभागाची कारवाई*.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

जेईई JEE-Advanced परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  

विकसित नागपूर-२०४७’ आराखड्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मित्रा’ संस्थेच्या वतीने नागपूर विभाग शाश्वत विकासाच्या रणनीतीवर आधारित कार्यशाळेचा समारोप

vishwatmaklokswamivarta