vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचा पुढाकार स्वतःचे गणना प्रपत्र भरून केले डिजिटायझेशन नागरिकांनाही विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचा पुढाकार स्वतःचे गणना प्रपत्र भरून केले डिजिटायझेशन नागरिकांनाही विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण -२०२६ मोहिमेअंतर्गत अहिल्यानगरचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी सुधीर पाटील यांनी स्वतःचे गणना प्रपत्र भरून त्याचे डिजिटायझेशन पूर्ण केले. मतदार पुनरीक्षण प्रक्रियेत स्वतः सक्रिय सहभाग नोंदवून त्यांनी नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.तहसील कार्यालयात श्री. पाटील यांनी स्वतः भरलेले गणना प्रपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी श्री. पाटील म्हणाले की, मतदार यादी अचूक, अद्ययावत व त्रुटिरहित ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने आपले गणना प्रपत्र विहित मुदतीत भरून त्याचे डिजिटायझेशन करून घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आवश्यक सहकार्य करून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

तसेच, कुटुंबातील सर्व पात्र मतदारांनी आपापली गणना प्रपत्रे भरून त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण करावे व लोकशाही बळकट करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन

आरटीई २५ टक्के जागांच्या नोंदणीला सुरुवात-रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १६ मार्चपर्यंत मुदतवाढ..

गडचिरोलीचे स्वतंत्र व्हिजन ठरवा; राष्ट्रीय सरासरीपेक्षा पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवा”*सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचेकडून प्रधानमंत्री धनधान्य किसान योजनेचा आढावा*

vishwatmaklokswamivarta

भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते मौजे सिरसवाडी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन

पत्रकारीता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाके-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी