vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 11 डिसेंबरला आयोजन प्रवेशासाठी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत…

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 11 डिसेंबरला आयोजन प्रवेशासाठी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत…

      सांगली, द प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 11 डिसेंबर 2025 रोजी बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे करण्यात येणार आहे. यामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवक, युवती, विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. तरी जास्तीत जास्त युवक, युवती, विद्यार्थ्यांनी दि. 9 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

       या जिल्हास्तरीय महोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी 15 ते 29 वयोगटातील युवक, युवती, विद्यार्थी व संस्था आपले प्रवेश जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथून विहित नमुन्यातील फॉर्म भरून किंवा गुगल लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdowgkUzmb0N0-_O3bcFYws8-i9SMcgS4lAI9E-so3nXuZdNw/viewform?usp=header द्वारे अर्ज करू शकतील, याबरोबरच जिल्हास्तरीय युवा महोत्सवाची लिंक सांगली जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे प्रमुख यांच्या व्हॉटसअप ग्रुपवर उपलब्ध करण्यात आली आहे.

          युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय व्दारे राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करून राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन जानेवारी 2026 दरम्यान करण्यात येणार आहे.        सन 2025-2026 या वर्षामध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये पुढील स्पर्धात्मक बाबींचा समावेश असेल. सांस्कृतिक विभागात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत तसेच कौशल्य विकास विभागात कथा लेखन, कविता लेखन, चित्रकला, वक्तृत्व या बाबींचा समावेश आहे. नवोपक्रम ट्रॅक विभागात विज्ञान प्रदर्शन मध्ये विद्यार्थी, युवक, युवती आपले नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प प्रदर्शित करतील. या प्रकल्पांमध्ये जैव तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, आरोग्य तंत्रज्ञान, डिजिटल उपाय योजना इ. विषयांचा सांघिक (5 युवांचा संघ) प्रकल्पांचा अंतर्भाव असावा.

        चित्रकला स्पर्धेकरिता नशामुक्त युवा किंवा युवकांसाठी आरोग्यदायी जीवनशैली हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. वक्तृत्व स्पर्धेमध्ये “भारतातील आणीबाणीचा काळ आणि संविधानाचे उल्लंघन” आणि “लोकशाही व लोकशाही मूल्यांचे संरक्षण” हे विषय असतील.

     सांस्कृतिक सांघिक बाबी अंतर्गत समूह लोकनृत्यसाठी प्रथम क्रमांक 7 हजार रूपये, व्दितीय 5 हजार रूपये, तृतीय क्रमांकासाठी 3 हजार रूपये, लोकगीतसाठी प्रथम क्रमांक 5 हजार रूपये, व्दितीय 3 हजार रूपये, तृतीय क्रमांकासाठी 2 हजार 500 रूपये रोख पारितोषिक आहे.         कौशल्य विकास बाबी अंतर्गत कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व व कविता लेखन या प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 3 हजार रूपये, व्दितीय 2 हजार रूपये, तृतीय क्रमांकासाठी 1 हजार 500 रूपये रोख पारितोषिक आहे.       नवोपक्रम बाबी अंतर्गत विज्ञान प्रदर्शन सांघिकसाठी प्रथम क्रमांक 5 हजार रूपये, व्दितीय 3 हजार रूपये, तृतीय क्रमांकासाठी 2 हजार रूपये रोख पारितोषिक आहे.

00000

संबंधित पोस्ट

ग्रीन फील्ड इंटरनॅशनल सेंट जोसेफ, तनवाणी इंग्लिश स्कूल  व गोदावरी पब्लिक स्कूल व्ही.आय.टि स्कूल यांचा वर्चस्व..

vishwatmaklokswamivarta

पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची मॅच फी असेल समान, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली घोषणा

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपची नितू घनघास बनली विश्वविजेती…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजितप्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

गुवाहाटी येथे पावसामुळे बारसापारा स्टेडियमवरील भारत विरुद्ध इंग्लंड आयसीसी विश्वचषक सराव सामना रद्द..

vishwatmaklokswamivarta