vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

परतवाड्यात 16 मे रोजी सेंट्रल बँकेचा ‘एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रम’; उद्योजकांना जागेवरच मिळणार कर्ज मंजुरी पत्र

परतवाड्यात 16 मे रोजी सेंट्रल बँकेचा ‘एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रम’; उद्योजकांना जागेवरच मिळणार कर्ज मंजुरी पत्र

 

अमरावती, प्रतिनिधी: अमरावती जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक विशेष संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार, दिनांक 16 मे 2026 रोजी दुपारी वाजता परतवाडा येथील सोसियल -3 रा मजला, अर्धसैनिक कँटीन, विदर्भ हाऊसिंग बोर्ड, हरडे नगर येथे ‘एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईच्या उपमहाव्यवस्थापक श्रीमती प्रीती सारस्वत उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षपद पंकज गुप्ता भूषवतील. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या पात्र उद्योजकांना बँकेच्या विविध कर्ज योजनांची सविस्तर माहिती मिळण्यासोबतच, ‘इन-प्रिन्सिपल सँक्शन लेटर’ (तत्त्वतः मंजुरी पत्र) जागेवरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सेंट्रल बँकेच्या विशेष ‘एमएसएमई महोत्सवा’अंतर्गत केवळ 16 मे रोजी कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकांना बाजारातील सर्वात कमी व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात मोठी सवलत दिली जाणार आहे. याशिवाय, नवउद्योजकांसाठी उद्यम नोंदणी, जीएसटी अनुपालन आणि इतर व्यावसायिक कायदेशीर बाबींवर तज्ज्ञांद्वारे मोफत मार्गदर्शन केले जाईल. अमरावती आणि परतवाडा परिसरातील जास्तीत जास्त व्यावसायिक आणि उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे

*****

संबंधित पोस्ट

वैध मापन शास्त्र कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन

कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिनस्त सात गाळे भाडे तत्वावर देण्यात येणार§ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी यांना संधी§ अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

अमृत-आयजीटीआर मार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्जाचे आवाहन

सहकार चळवळीच्या संवर्धनासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक