vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाचे अंतिम आरक्षण जाहीर*

*जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाचे अंतिम आरक्षण जाहीर*

गडचिरोली, प्रतिनिधी-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने दि. ०१ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणाच्या सदस्यपदांच्या आरक्षणासाठी सोडत कार्यक्रम जाहीर केला होता.

त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील ५१ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि १०२ पंचायत समिती निर्वाचक गणांच्या सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्याचा सोडत कार्यक्रम दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर पार पडला. सोडत कार्यक्रमानंतर प्रारुप आरक्षण अधिसूचना दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती

यानंतर आलेल्या सूचनांचा विचार करून आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १५३ जागांसाठी अंतिम आरक्षण अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. परिशिष्ट १३ (अ) आणि १३ (ब) अंतर्गत ही अंतिम अधिसूचना दि. ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, ती नागरिकांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रदर्शित करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

संबंधित पोस्ट

मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा-मराठीभाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ उभी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हाधिकारी कार्यालयात 101 अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान – ⁠101 पिशव्या रक्त संकलित

vishwatmaklokswamivarta

11 मार्च रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत..

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन

vishwatmaklokswamivarta