vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा-मराठीभाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा-मराठीभाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- विविध ज्ञान शाखांचे उच्चशिक्षण आपण इंग्रजी भाषेतून घेत असतो. या ज्ञानांची साधने ही आपल्या म्हणजेच मराठी भाषेतून असावीत. त्यासाठी सर्व विद्याशाखांचे ज्ञान हे मराठी भाषेत आणून विश्वकोश सारख्या मराठी ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वनस्पतीविज्ञान आणि भौतिकविज्ञान’ नोंदलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पंकजा वाघमारे अध्यक्षस्थानी होत्या. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त शास्त्रज्ञ विजय लाळे, शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. राजेंद्र सातपुते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अशोक चव्हाण, प्रा. अरविंद धाबे, महाविद्यालयाचे माजीप्राचार्य डॉ. नवल थोरात, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी.बी. राजेशेख, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुलोचना राठोड, विश्वकोश मंडळाचे विद्याव्यासंगी सहायक रविंद्र घोडराज, डॉ. स्नेहा खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रजवलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, मराठी विश्वकोश म्हणजे ज्ञानप्राप्तीचे विश्वासार्ह साधन होय. प्रत्येक संकल्पना विश्वकोशात अधिकृत मांडलेली असते. अलिकडच्या इंटरनेट युगात माहितीचे अनेक स्रोत आहेत. पण ह्या स्रोतातून मिळणारी माहिती अधिकृत असली पाहिजे. त्यासाठी ज्ञानालाआधार असावा लागतो. याशिवाय तयार केलेले ज्ञान हे सातत्याने अद्यावत केले गेले पाहिजे. नवनवीन संकल्पना, शोध, संशोधन यांचा त्यात समावेश करुन ज्ञान अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे.बुद्धिला चालना देण्याचे कार्य ज्ञान करीत असते. अशी ही ज्ञानाचे साधने मराठी भाषेतून निर्माण होणे आवश्यक आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. पंकजा वाघमारे यांनी केला. सूत्रसंचालन रुपेश मडकर यांनी तर डॉ. सुहासिनी गेडेकर यांनी आभार मानले.

०००००

संबंधित पोस्ट

धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जंतरमंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं, आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम६ आस्थापनांमधून ६७५ किलो अन्नसाठा जप्त; ५४ अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविले ग्राहकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रगती प्रकल्पामुळे पाच जिल्ह्यातील १,६०० खाटांची आरोग्य सुविधा बळकट होणार – मंत्री प्रकाश आबिटकर महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी घेणार शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील अनुपालनाचा आढावा

गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय आढावा