vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम६ आस्थापनांमधून ६७५ किलो अन्नसाठा जप्त; ५४ अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविले ग्राहकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम६ आस्थापनांमधून ६७५ किलो अन्नसाठा जप्त; ५४ अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविले ग्राहकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

 

नांदेड प्रतिनिधी: सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार मिठाई, खवा, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयामार्फत जिल्ह्यात विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले.

 

या अभियानात विविध ६ आस्थापनांची तपासणी करून ८ अन्न नमुने घेण्यात आले असून, एकूण ६७५ किलो अन्नसाठा, अंदाजे किंमत २ लाख ८९ हजार ८० रुपये, जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये तूप, खवा, कुंदा पेढा, स्वीट पेढा, मावा पेढा तसेच खाद्यतेलाचा समावेश आहे.या तपासणीदरम्यान मे. शिवकृपा दूध भांडार, देगलूर नाका, नांदेड येथून ८८ किलो तूप व ४९ किलो खवा, मे. श्रीसाई खवा सेंटर, मालेगाव रोड, नांदेड येथून ९९ किलो खवा, मे. खंडेलवाल मिठाई, एमआयडीसी, नांदेड येथून ९९ किलो खवा जप्त करण्यात आला. तसेच मे. बदामराव पेढेवाले, पाळज, ता. भोकर येथून ३८ किलो कुंदा पेढा व ७८ किलो स्वीट पेढा, मे. काशीराम दाचावर, कुंडलवाडी, ता. बिलोली येथून १४६ लिटर रिफाईंड सोयाबीन तेल (कृष्णा गोल्ड) आणि मे. जगदंबा बिकानेर, वाई बाजार, ता. माहूर येथून ७८ किलो मावा पेढा जप्त करण्यात आला.

याशिवाय जिल्ह्यातील स्वीट मार्ट, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या २८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान खवा, पनीर, पेढा, बर्फी, खाद्यतेल आदींचे एकूण २६ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची खरेदी करताना ग्राहकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत. पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना पॅकिंगवरील माहिती, वैधता कालावधी व इतर आवश्यक तपशील तपासून घ्यावेत. मिठाई व दुग्धजन्य पदार्थांची योग्य ठिकाणी साठवणूक करण्यात आली आहे का, तसेच त्यांचा लवकर वापर केला जातो का, याचीही दक्षता घ्यावी.

अन्न भेसळ अथवा असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच FOSCOS या ऑनलाइन पोर्टलवर अथवा complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

**

संबंधित पोस्ट

प्रत्येक रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्यसुविधा आता जिल्ह्यातच मिळणार – मंत्री हसन मुश्रीफ २५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळ

पोलीस दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगली ग्रामीण पोलीस ठाणे विस्तारीत पहिल्या मजल्याचे लोकार्पण..

जिल्ह्यातील तापमानात वाढ उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त तात्पुरती वीज संच मांडणीची उभारणी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीच्या मार्गात बदल..