vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

देसाईगंज येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सहाय्यभूत साहित्य मोजमाप शिबिर**समग्र शिक्षा व सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रम; चार तालुक्यांतील १२५ विद्यार्थ्यांचा सहभाग*

*देसाईगंज येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सहाय्यभूत साहित्य मोजमाप शिबिर**समग्र शिक्षा व सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रम; चार तालुक्यांतील १२५ विद्यार्थ्यांचा सहभाग*

 

गडचिरोली, प्रतिनिधी : समग्र शिक्षा व सेवा संकल्प अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक सहाय्यभूत साहित्य व उपकरणांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गट साधन केंद्र, देसाईगंज येथे

काल सहाय्यभूत साहित्य व कॅलिपरसाठी मोजमाप निश्चिती शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरमोरी, कोरची, कुरखेडा आणि देसाईगंज या चार तालुक्यांतील नोंदणी केलेल्या १२७ विद्यार्थ्यांपैकी १२५ विद्यार्थ्यांनी शिबिरात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.

दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, त्यांच्या गरजेनुसार योग्य सहाय्यभूत साधने निश्चित करणे आणि त्याद्वारे त्यांचे दैनंदिन जीवन व शैक्षणिक सहभाग अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरासाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO)चे मुंबई व दिल्ली येथील तज्ज्ञ उपस्थित होते. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक सहाय्यभूत साहित्य व कॅलिपरसाठी मोजमाप घेतले तसेच आवश्यक उपकरणांची निश्चिती केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट साधन केंद्र, देसाईगंजचे गटसमन्वयक ज्ञानेश्वर बांडेसर होते. त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शासकीय योजना, शैक्षणिक सुविधा व सहाय्यभूत साधनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षकांनी सातत्याने समन्वय ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद गुरनुले यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध योजना व सुविधांचा लाभ घेऊन त्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगतीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी कुरुड केंद्राचे केंद्रप्रमुख आशिष बारापत्रे आणि जिल्हा समन्वयक श्री. हुकरे उपस्थित होते.

अविनाश पिंपळशेंडे यांनी प्रास्ताविकातून शिबिराची रूपरेषा, उद्दिष्टे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभूत साहित्य उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली.

शिबिराच्या नियोजन व व्यवस्थापनासाठी चारही तालुक्यांतील विशेष शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांशी समन्वय साधला. कार्यक्रमाचे संचालन विशेष शिक्षिका अलका सोयाम यांनी केले. नोंदणी व व्यवस्थापनासाठी दिपाली गुडेपवार (आरमोरी), श्री. वाघधरे (कोरची), हेमंत सपाटे (कुरखेडा), वैशाली खोब्रागडे, अमोल पडोळे तसेच काळजीवाहक जयश्री, पायल व शामिला यांनी सहकार्य केले.

गट साधन केंद्राच्या चमूतील श्री. घुटके, श्री. पटले, श्रीमती हुलके, कु. रानू ठाकूर, श्रीमती चुन्हे यांच्यासह संबंधित तालुक्यांतील विशेष शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वय साधला. विशेष शिक्षिका वैशाली खोब्रागडे यांनी उपस्थित तज्ज्ञ, अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

००००

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

vishwatmaklokswamivarta

एमएसआरडीसी’च्या द्रुतगती महामार्गांमुळेराज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

अग्निवीर भरतीसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे१० ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजन; इच्छुक युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

vishwatmaklokswamivarta

सेवा संकल्प शिबीर’ जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे