vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला सुरक्षितता सर्व्हेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महिला सुरक्षितता सर्व्हेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- जिल्ह्यात महिलांची कामाच्या ठिकाणी, कुटुंबात, सार्वजनिक ठिकाणी कितपत सुरक्षितता आहे तसेच त्याबद्दल महिलांना काय वाटते याबाबत सर्व्हेक्षण करुन जिल्हा महिलांसाठी सुरक्षित रहावा यासाठी उपाययोजना राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक आज पार पडली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, पोलीस निरीक्षक तेजश्री पाचपुते, सहा. पोलीस निरीक्षक आरती जाधव, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, डॉ. बी.एस. लांजेवार, माविमचे समन्वयक चंदनसिंग राठोड, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदारे तसेच अशासकीय सदस्य आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांना घरी,सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावयास हवे. त्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन, सहाय्य इ. दिले जावे. पिडीत महिलांचे पुनर्वसन केले जावे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी संयुक्त प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील महिलांना खरोखर सुरक्षित वाटते का? याबाबत महिलांचे सर्व्हेक्षण करुन त्यानंतर उपाययोजना राबवाव्या,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.०००००

संबंधित पोस्ट

जनधन*खातेधारकांसाठी* *रीकेवायसी*आणिजनसुरक्षायोजनांची*अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात*

पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी प्रवेशासाठी 10 ऑगस्टची मुदत..

भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नद्यांचे खोलीकरण, गाळ काढण्याचे काम प्राधान्याने करा-पालकमंत्री ना. मकरंद पाटील· अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण करा· दिवाळीआधी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत· जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न· प्रशासकीय मान्यता पूर्ण करा

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कठोरकायदा करणार मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !हिंदु जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ यांची छत्तीसगडचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह बैठक..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू