vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक 1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2025 पासून होणार सुरू

महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक-1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक  1 नोव्हेंबर, 2025  पासून होणार सुरू

 

राज्य प्रतिनिधी-महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2025 पासून होणार सुरू

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना (पीएमएमव्हीवाय) साठी ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ क्रमांकात बदल केला आहे. मदत क्रमांक नागरिकांना लक्षात ठेवणे आणि त्याचा वापर करणे सोपे व्हावे, यासाठी विद्यमान क्रमांक 14408 याऐवजी आता नवीन हेल्पलाइन क्रमांक 1515 असा राहील. येत्या 1 नोव्हेंबर 2025 पासून हा नवीन मदत क्रमांक सुरू होईल.

पोषण आणि पीएमएमव्हीवाय योजनांअंतर्गत मदत मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना मदत क्रमांकावरून त्वरित दूरध्‍वनी करणे सोपे होणार आहे. सध्‍या एकत्रीकरण प्रक्रिया सुरू असल्याने, वापरकर्त्यांना काहीवेळा संक्रमण कालावधीचा अनुभव येऊ शकतो. या काळात, जर कॉलर नवीन क्रमांक 1515 वर ‘कनेक्ट’ होऊ शकत नसतील, तर त्यांना जुना क्रमांक 14408 वापरणे सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पोषण आणि पीएमएमव्हीवायशी संबंधित प्रश्न, माहितीसाठी ‘हेल्पलाइन’ संपर्काचे एकल केंद्र म्हणून काम करत राहील. देशभरातील सर्व लाभार्थ्यांसाठी सुरळीत संवाद आणि अखंडित मदत सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे.

संबंधित पोस्ट

निराधार, श्रावणबाळचे पैसे तात्काळ वितरीत करावेत-उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांचे निधन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधीआपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीत जनजागृतीची प्रभावी मोहीम

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज- सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू