vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या-वाहनांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या-वाहनांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी):- जिल्ह्यात वाळूची अनधिकृत वाहतुक करणारी वाहनांवर कारवाई करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. पोलीस, महसूल आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त गस्त घालून कारवाई करावी,असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, उप अधीक्षक भुमिअभिलेख निलेश उंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर.जी. देसले जिल्हा मुख्यालयातून तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे दृरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुक केल्याप्रकरणी वर्षभरात १७४ कारवाई करण्यात आल्या. या प्रकरणी ३ कोटी ३३ लाख रुपये इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी १ कोटी ९७ लाख ५३ हजार रुपये इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. २३ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून १६७ वाहने व ४ यंत्रे जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण १० हजार ४६ प्रास वाळू चार प्रमुख वाळू डेपोवर उपलब्ध आहे. त्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या वापरासाठी ४७०१ ब्रास तर शासकीय कामांसाठी ४३७४ ब्रास वाळू उपलब्ध आहे.

  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, जिल्ह्यातील खदानींनी मोजणी भुमिअभिलेख विभागामार्फत करण्यात यावी. वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुक हा गंभीर विषय असून याबाबत महसूल, पोलीस, परिवहन विभागाच्या संयुक्त पथकांनी कारवाई करावी. विना क्रमांक हायवांना पकडून गुन्हे दाखल करावे. रात्रीची गस्त सुरु करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.०००००

संबंधित पोस्ट

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा आढावा

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड;गुरुवारी (दि.२ एप्रिल) विशेष सभा

ई-चलानद्वारे दंडात्मक रकमेचा भरणा प्रलंबित असलेल्या वाहनमालकांनी-एआय रिकव्हरी असिस्टंस् द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा..