vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवाने आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवाने आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी: मुंबई – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवाने आणि त्यासंदर्भातील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्यशासन सकारात्मक असून यासाठी शासनाने उडानच्या धर्तीवर आरसीएस फंडिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

    मंत्रालयात चिपी – मुंबई विमानसेवा विषयी बैठक झाली. त्यावेळी श्री. राणे बोलत होते. बैठकीस सचिव संजय सेठी, विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  चिपी – मुंबई विमानसेवा सुरू होणे ही सिंधुदुर्गसाठी भावनिक बाब असल्याचे सांगून मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की, या विमानतळासाठीच्या पायाभूत सुविधाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने चिपी विमानतळास वेगळे महत्व आहे. चिपी – मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणारे सर्व परवाने एक महिन्यात घेण्यात यावेत. विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर यांनी समन्वयाने काम करावे. भविष्यात या विमानतळाला मोठे महत्त्व येणार असल्याने प्राधान्याने कामे करावीत. सुशोभीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, असे निर्देशही श्री. राणे यांनी दिले.

नवी मुंबई येथील मरिनाचे काम मार्च २६ अखेर पूर्ण करा ,नवी मुंबई येथील बेलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मरिनाचे काम येत्या मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करावे. यासाठी ठेकेदार कंपनीने नियोजन करावे. तसेच या ठिकाणी दुकानासाठी गाळे उभारून ते भाडेतत्वावर देण्यात यावेत. या कामाचे सर्व परवाने प्राप्त असल्याने हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित करावा असे निर्देश श्री. राणे यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपींना अटक..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच विकास कामे करावीत- मंत्री योगेश कदम

मुंबई येथे डिझेल, पेट्रोल व पेट्रोलियमसदृश द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

vishwatmaklokswamivarta

भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

जालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे-संतोष खांडेकर

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न