vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकार विष्णु कदम यास मारहाण करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी

बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकार विष्णु कदम यास मारहाण करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी

जालना । प्रतिनिधी – येथील पत्रकार विष्णू कदम यांना बातमी प्रसिद्धीचा राग मना धररुन राम सावंत, हर्षवर्धन सावंत, राम कुराडे व इतर चार-पाच जणांनी मारहाण केली. श्री कदम यांनी याबाबत रितसर कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आजपावेतो गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके व पदाधिकारी तसेच पत्रकारांनी अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले व मारहाण करणार्‍या दोषींवर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर श्री नोपाणी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कदीम जालना पोलीस निरीक्षकांना यासंदर्भात चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देणार असल्याचे आश्‍वासन प्रेस कॉन्सील महाराष्ट्र जालना जिल्हा पदाधिकार्‍यांना दिले आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विश्‍वक्रांती मराठवाडा या वृत्तपत्राचे संपादक विष्णू कदम यांना बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून राम सावंत, हर्षवर्धन सावंत, राम कुराडे व ईतर चार-पाच जणांनी लाथा बुक्क्याने मारहाण करुन जीव मारण्याची धमकी दिली. ही घटना दि 20 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10 ते साडे दहा वाजेच्या सुमारास मस्तगड येथील पोलीस चौकी जवळ मारहाण केली. सदरील घटनेचा जालना जिल्ह्यातील पत्रकार निषेध व्यक्त करताहेत. विष्णु कदम यांना झालेल्या मारहाणीनंतर कदम यांना तातडीने शासकीय रुग्णाालयात दाखल करण्यात आले होते. दि. 20 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात विष्णू कदम यांनी रितसर तक्रार दाखल केलेली आहे. मात्र, आजपावेतो कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा पोलीसांनी दाखल केलेला नाही. कदम यांना मारहाण करणार्‍या व्यक्ती ह्या राजकीय आहेत. त्यांनी राजकीय ताकद वापरुन अथवा ईतर आर्थिक मार्गाने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते आहे. मे. साहेबांना विनंती आहे की, सदरील प्रकरणात पत्रकार विष्णु कदम यांना घटनेच्या अनुषंगाने त्या दिवशी आलेले फोन कॉल रेकॉर्ड चेक करण्यात यावेत. मस्तगड भागातील पोलीस चौकी समोर घटना घडली आहे. त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात यावेत. व निष्पक्ष चौकशी करुन दोषी असलेल्या राम सावंत, हर्षवर्धन सावंत, राम कुराडे व इतर चार ते पाच जणांवर पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करावा.

तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून राम कुराडे यांनी स्वतः मारहाण केल्याचे मान्य केले आहे. एका पोस्ट द्वारे राम कुराडे यांनी पत्रकार विष्णू कदम याच्याबद्दल अपशब्द देखील वापरले आहे. वरिल सर्व बाबींचा निष्पक्ष आणि सविस्तर तपास करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पीसीएमच्यावतीने करण्यात आली.

निवेदनावर पीसीएमचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, विष्णु कदम, सुहास वैद्य, भरत मानकर, ओमप्रकाश शिंदे, संतोष भुतेकर, शेख ईलियास अब्बास, आमेर खान, निकीता काळे, अशफाक पटेल, सुनील नरवडे, शेख शकील, संदीप भाकरे, दिनेश नंद, अतुल पडुल, बासित बेग, शेख सलीम, शेख मुजिबोद्दीन यांच्यासह पत्रकारांच्या सह्या आहेत.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत जाहीर

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिन; मुख्य कार्यक्रम बिबी का मकबराच्या प्रांगणात,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महापौर सुजाता पाटील यांनी विशेष बैठकीत घेतला पावसाळी स्थितीचा सविस्तर आढावा 

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य..

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्याशिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta