vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिन; मुख्य कार्यक्रम बिबी का मकबराच्या प्रांगणात,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आंतरराष्ट्रीय योग दिन; मुख्य कार्यक्रम बिबी का मकबराच्या प्रांगणात,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाज नगर प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार दि.२१ रोजी असून यानिमित्त जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम शहरातील ऐतिहासिक स्थळ बिबी का मकबराच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक योग संस्थांनी व व्यायाम प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगिता राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आश्विनी लाटकर, मनपाचे शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाचे डॉ. एस. के. भगत, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य आदेश चिंतूरजर, शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवल थोरात, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, जिल्हा योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकर तसेच विविध योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, यंदाचा योग दिवस हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या स्थळांवर आयोजीत करण्यात येणार आहे. त्यासाठी बिबी का मकबरा च्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजीत करण्याचे निर्देश आयुष मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार शनिवार दि.२१ रोजी हा कार्यक्रम सकाळी साडेसहा वा. होणार हे. या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण व सामुहिक योगासने होणार आहेत. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही थेट प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सर्व व्यायामप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाभरात सर्व योग, व्यायाम प्रेमी संघटनांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. प्रत्येक ठिकाणी संस्थांनी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजीत करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले आ

संबंधित पोस्ट

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

सुरंगीच्या सुगंधाने निसर्गोद्यान दरवळणार – महापौर, आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

महाराष्ट्र राज्यातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पथकाकडून आढावा!

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी….

बालकांच्या दत्तक प्रक्रियेसाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- मंत्री आदिती तटकरे· विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांच्या दत्तक प्रक्रियेसाठी प्रादेशिक सहकार्य अधिक मजबूत· पुण्यात सीएआरए ची पश्चिम विभागीय सल्लामसलत कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta