vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी –महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी झाली होती. या परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आला आहे. या उमेदवारांना आपले म्हणणे मांडता यावे यासाठी दि.२५ मार्च ते दि.४ एप्रिल दरम्यान सकाळी ११ वा. सुनावणी होणार आहे. तरी उमेदवार निहाय दिलेल्या नियोजनप्रमाणे उमेदवारांनी आपले म्हणणे मांडण्याकरीता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयात उपस्थित राहणेबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ई-मेल एस.एम.एस व परीक्षार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी त्यांना कळविण्यात आलेल्या दिवशी सकाळी ११ वा. स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे. हजर न राहिल्यास उमेदवारांना या प्रकरणी काही सांगावायचे नाही असे गृहीत धरुन त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय बंधनकारक राहील. सुनावणीच्या वेळी उमेदवारांनी आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ मधील उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी, परीक्षेचे प्रवेशपत्र पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगिक सर्व कागदपत्रे, गुणपत्रक, प्रमाणपत्र तसेच फोटो ओळखपत्र, (चालक, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) यापैकी कोणतेही एक यासह स्वत: उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही याची नोंद घ्यावी,असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद आयुक्त श्रीमती अनुराधा ओक यांनी कळविले आहे.०००००

संबंधित पोस्ट

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार् करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित करणार- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण

आंबेनळी घाट मार्गावरील वाहतूक सुरु

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

💐 *”कीर्तनमंदाकिनी चा सूर हरपला”* दि २४ डिसेंबर २०२५ सुप्रसिद्ध जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.मंजुश्रीताई खाडिलकर अनंतात विलीन*

vishwatmaklokswamivarta

फळपिक विमा योजनेंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविण्याचे आवाहन