vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत बीइएसटी बेस्टच्या तिकीट दरात दुप्पट वाढ; ८ मेपासून नवे दर लागू

मुंबईत बीइएसटी बेस्टच्या तिकीट दरात दुप्पट वाढ; ८ मेपासून नवे दर लागू…

 

राज्य प्रतिनिधी

 मुंबई आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाला  अखेर तिकीट दरात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर ८ मेपासून ही दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

नव्या दरांनुसार, सध्या ५ रुपयांना मिळणारे किमान बस तिकीट आता १० रुपये होणार आहे, तर वातानुकूलित बसचे किमान तिकीट ६ रुपयांऐवजी १२ रुपये लागणार आहे. दररोज प्रवास करणाऱ्यांसाठीही झटका असून, दिवसभराचे तिकीट ६० रुपयांवरून ७५ रुपये करण्यात आले आहे. मात्र, या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे — ५ ते १२ वयोगटातील मुलांना हाफ तिकीट पुन्हा लागू करण्यात आले आहे. दरवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ‘रिजनल ट्रॅफिक ऑथोरिटी’कडे सादर केला असून, त्यांच्या अंतिम मंजुरीनंतर दोन-तीन दिवसांत नव्या दरांची अंमलबजावणी होईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या दशकभरात बेस्टला ११ हजार कोटींचा आर्थिक आधार दिल्यानंतरही अडचणी कायम असल्याने अखेर महापालिकेने तिकीट दरवाढीला संमती दिली आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांवर भार वाढणार असला, तरी उपक्रमाची आर्थिक सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित पोस्ट

शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्थांनी तंबाखुमुक्तीसाठी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदू जनजागृती समिती

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

१० लाख रुपयांची मदत बँक खात्यात जमा; मॅनहोल दुर्घटनेतील दिवंगत असलम शेख यांच्या पत्नीकडून पत्र लिहून महानगरपालिकेचे आभार-श्रीमती अंजुम शेख यांनी महापौरांप्रति व्यक्त केली कृतज्ञता

vishwatmaklokswamivarta

पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अडकलेले नाणे मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर