सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ ! राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ !
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन
मुंबई- ‘ प्रतिनिधी
अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर, गोहत्या आदी समस्यांत ‘कार्पोरेट जिहाद’, ‘जैविक जिहाद’ यांसम नव्या संकटांची भर पडली आहे. सामान्य व्यक्तीला वरीलपैकी कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू शकते. अशा संकटसमयी काय करावे, याचे उत्तर भारताचे अद्वितीयत्व असलेल्या गुरु-शिष्य परंपरेने आधीच देऊन ठेवले आहे. ते समाजापर्यंत पोचवावे, यासाठी सनातन संस्था यंदाचा ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा ‘रामराज्याच्या निर्मितीची दिशा स्पष्ट करणारा उत्सव म्हणून साजरा करत आहे. हा उत्सव बुधवार, २९ जुलै या दिवशी होत आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ९ ठिकाणी हे महोत्सव होणार आहेत. माटुंगा, विलेपार्ले, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कोपरखैरणे आणि पनवेल या ठिकाणी या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, तसेच ‘रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी ७२०८१३०८३० या क्रमांकावर संपर्क करू शकता, असे आवाहन संस्थेने केले आहे.
ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ आयोजित करण्यात केले आहेत. २९ जुलैला सायं ५.३० वा. पासून मराठी भाषेतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ पुढील मार्गीकेवर (लिंकवरून) घेता येईल – YouTube.com/@SSMarathi
स्थानिक गुरुपौर्णिमेचे पत्ते व वेळा :
१. दादर माटुंगा कल्चरल सेंटर, १२२-ए, जे.के.सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माटुंगा (प.) : सायं ६.०० वा.
२. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, शहाजीराजे मार्ग, विलेपार्ले (पू.) : सायं ६.०० वा.
३. हार्मनी बँक्वेट हॉल, टॅंक रोड, मिनी लँडसमोर, भांडुप (प.) : सायं ६.०० वा.
४. कै.अण्णासाहेब पाटील मेमोरियल हॉल, लोकमान्य टिळक कॉलेजसमोर, सेक्टर ५, कोपरखैरणे, नवी मुंबई : सायं ६.०० वा.
५. श्री अय्यप्पा मंदिर सभागृह, ब्राह्मण विद्यालयाच्या जवळ, वर्तक नगर, ठाणे (प.) : सायं ६.०० वा.
६. सी.के.पी. हॉल, दुसरा मजला, एन.के.टी.कॉलेजच्या जवळ,खारकर आळी, कोर्ट नाका, ठाणे (प.) : सायं ६.०० वा.
७. शुभमंगल सभागृह, भाजी मार्केट, बाटा शोरूमच्या वर, रेल्वे स्थानकाजवळ, डोंबिवली (पू.) : सायं ६.०० वा.
८. भालचंद्र दिनकर सभागृह, सुखनिवास, गणपती चौक, शु मॉलच्या जवळ, आग्रा रोड, कल्याण (प.) : सायं ५.३० वा.
९. श्री बँक्वेटस हॉल, शबरी हॉटेलच्या मागे, सेक्टर १/एस, नवीन पनवेल : सायं ५.३० वा.श्री. अभय वर्तक,
प्रवक्ता, सनातन संस्था,
(संपर्क : ९९८७९२२२२२)