vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगेंची ऐतिहासिक कामगिरी

जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगेंची ऐतिहासिक कामगिरी

—————————————

जालना (प्रतिनीधी) व्हिएतनाम मधील ‘द नांग’ शहरात दि.१० मे २०२६ रोजी पार पडलेल्या जागतिक आयर्नमॅन ट्रायथलॉन १४०.६ मैल स्पर्धेत जालन्याचे सुपुत्र कैलास गजानन झोळगे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत ऐतिहासिक कामगिरी बजावली असून संपूर्ण मराठवाड्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. त्यांनी तब्बल २२६ किमीचे अत्यंत खडतर अंतर अवघ्या १५ तास २३ मिनिटे ५५ सेकंदांत पूर्ण करून जालना जिल्ह्यातील पहिले ‘पूर्ण आयर्नमॅन’ होण्याचा मान पटकावला आहे. ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण सहनशक्ती स्पर्धांपैकी एक मानली जाते. यात समुद्रात पोहणे, सायकलिंग आणि मॅरेथॉन धावणे अशा तिहेरी आव्हानांचा समावेश असतो. कैलास झोळगे यांनी अत्यंत जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या बळावर हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण केले. विशेष म्हणजे, पूर्णतः शाकाहारी जीवनशैली अंगीकारून आणि कोणतेही सप्लिमेंट न घेता त्यांनी ही अविस्मरणीय कामगिरी करून दाखवली आहे.

स्पर्धेची सुरुवात सकाळी ६:३५ वाजता पोहण्याच्या टप्प्याने झाली. कैलास झोळगे यांनी १ तास १६ मिनिटे ५९ सेकंदांत पोहण्याचा टप्पा पूर्ण केला. त्यानंतर ७ तास ३२ मिनिटे ५२ सेकंदांत सायकलिंगचा टप्पा यशस्वीपणे पार करत त्यांनी मॅरेथॉन धाव पूर्ण करून अखेर आयर्नमॅनचा बहुमान पटकावला. यापूर्वीही त्यांनी गुजरात येथील ओशियन राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत 15 किमी स्विमिंग करून द्वितीय क्रमांक मिळवला होता. तसेच कोल्हापुरात झालेल्या हाफ आयनमॅन लोहपुरुष ट्रायथलॉन मध्येही त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.आपल्या विजयानंतर भावना व्यक्त करताना कैलास झोळगे म्हणाले की, “१५:२३:५५ तासांत २२६ किमी पूर्ण केला…पण खरा फिनिश लाईन तुमचा अभिमान होता. मेडल घरी येईल, पण तुमचं प्रेम मनात कायम राहील. हा आयर्नमॅन फक्त माझा नाही… संपूर्ण मराठवाड्याचा असल्याची भावना कैलास झोळगे यांनी व्यक्त केली. या ऐतिहासिक यशामुळे जालना जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री त्यांचे जालन्यात आगमन होताच क्रीडाप्रेमी जनतेने केला झोळगे यांचे जल्लोषात स्वागत केले.या यशामुळे मराठवाड्याच्या क्रीडा क्षेत्रात एक नवीन इतिहास रचला गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.————–कैलास झोळगे यांच्या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल – कैलास गोरंटयाल———–‘शाकाहारी आयर्नमॅन’ म्हणून कैलास झोळगे यांनी तरुणांसमोर जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वासाचा आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या या यशामुळे अनेक युवकांना नव्या उमेदीची प्रेरणा मिळेल असा आशावाद जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला.या यशाबद्दल माजी आमदार गोरंटयाल यांनी झोळगे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

बिहारमधील अनेक भागांत, विशेषतः पटना शहरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत.

vishwatmaklokswamivarta

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, महापौर महायुतीच्या घटकपक्षांच्या चर्चेनंतर होणार – श्रीकांत शिंदे

vishwatmaklokswamivarta

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एफएसएसएआय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे मुंबईतील 10000 स्ट्रीटफूड विक्रेत्यांना देत आहेत प्रशिक्षण

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये एकदिवसीय जिल्हा परिषद ठाणे येथे संवेदनशीलता कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांना कौन्सिलिंगव्दारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण 

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड