vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी – विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पारंपारिक लोककलाकार आणि कारागिरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नटराज पुरस्कार व विश्वकर्मा पुरस्कार देण्यात येणार असून इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सातारा यांनी केले आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता सामाजिक, कलात्मक व प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पारंपारिक लोककलाकार, लोककलावंत तसेच पारंपारिक कारागिरांना या योजनेअंतर्गत सन्मानित करण्यात येणार आहे. विभागस्तरावर एकूण ७ पुरस्कार देण्यात येणार असून राज्यस्तरावरही पुरस्कार प्रदान करण्यात येतील. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये महिलांसाठी एक व पुरुषांसाठी एक पुरस्कार राखीव ठेवण्यात आला आहे.

पुरस्कारप्राप्तांना शासनमान्य सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल किंवा साडी-खण व श्रीफळ देण्यात येणार आहे. यासोबतच रु. २५,००० ते रु. ५१,००० पर्यंतची रोख रक्कम किंवा धनादेश स्वरूपात आर्थिक पुरस्कारही दिला जाणार आहे.

या पुरस्कारासाठी पात्रतेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सामाजिक, कलात्मक किंवा प्रबोधन क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य केलेले असणे आवश्यक आहे. पुरुष अर्जदारांचे वय ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आणि महिलांचे वय ४० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अपवादात्मक प्रकरणांमध्ये वय मर्यादेत शिथिलता देण्याचा अधिकार निवड समितीकडे राहील. तसेच एकाच व्यक्तीस हा पुरस्कार एकापेक्षा अधिक वेळा दिला जाणार नाही.

पात्र व्यक्ती किंवा संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह ४ प्रतींमध्ये प्रस्ताव दि. ८ एप्रिल २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे सादर करावेत. प्रस्तावासंदर्भातील अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

एन.डी.ए.,सी.डी.एस.परीक्षा 13 एप्रिल रोजी4447 उमेदवारांची बैठक व्यवस्था..

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी सामाजिक चळवळ उभी राहावी  – प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन…

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याने त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे.

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत रिनिव्हेबल एनर्जी मोहिमेतून सोलार प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार

मिरज तालुक्यात शासकीय जमिनीवरील-निवासी अतिक्रमण नियमित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2026