vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार जळगाव मुंबई 26 तारखेपासून सुरू होणार

मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार जळगाव मुंबई 26 तारखेपासून सुरू होणार

राज्य प्रतिनिधी-ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. सध्या ही सेवा आठवड्यातून फक्त चार दिवस सुरू होती. अलायन्स एअर कंपनीच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसाठी व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज आणि वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते, त्यामुळे दररोज विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई विमानतळावरून सायंकाळी सात वाजता जळगावसाठी विमान उड्डाण घेईल आणि रात्री आठ वाजून पंचवीस मिनीटांनी जळगाव विमानतळावर पोहोचेल. त्याचप्रमाणे जळगावहून मुंबईसाठी रात्री आठ वाजून पन्नास मिनीटांन विमान उड्डाण घेईल आणि मुंबई विमानतळावर रात्री दहा वाजून दहा मिनीटांनी पोहोचेल. सध्या २६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. तर जळगावरून मुंबईसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. २६ ऑक्टोबरनंतर दोन्ही बाजूने दररोज विमानसेवा उपलब्ध असेल

उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी सध्या विमानसेवा सुरू आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे जळगाव आणि मुंबई या शहरांमधील प्रवास आणखी सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे. प्रवाशांना वेळेची बचत होईल आणि दोन्ही शहरांमधील संपर्क अधिक मजबूत होईल. अलायन्स एअरच्या या निर्णयामुळे उडान योजनेंतर्गत जळगाव विमानसेवा अधिक लोकप्रिय होईल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.

 

संबंधित पोस्ट

आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांना 7 एप्रिल पर्यंत कर्ज फॉर्म भरण्याचे आवाहन..

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

नवीन पाच पोलीस चौकींमुळे नागपुरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाच पोलीस चौकींचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अग्रेसर राहणार- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचा विश्वास,जिल्हा गुंतवणूक परिषदेत ८६ सामंजस्य करार> ६३१.६७ कोटींची गुंतवणूक> २,९२४ नवीन रोजगार निर्मिती