vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगरला अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक जोडणी देणाऱ्या नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ कि.मी. लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार

मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगरला अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक जोडणी देणाऱ्या नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ कि.मी. लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार

राज्य प्रतिनिधी -पुणे–शिरूर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करून मुंबई व जेएनपीटीशी थेट संपर्क निर्माण करणारा हा मार्ग राज्याच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणार आहे. रायगड, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर परिसराच्या आर्थिक, औद्योगिक आणि दळणवळण विकासाला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे.

विशेषतः खेड एसीझेड, तळेगाव, चाकण, रांजणगाव व सुपा औद्योगिक क्षेत्राला या मार्गाचा मोठा फायदा होणार असून खेड, शिरूर, आंबेगाव आणि मावळ परिसरातील विकासाला नवी गती मिळणार आहे. उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल.

या प्रकल्पासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी विशेष पाठपुरावा व सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे त्यांनी पाहिलेले स्वप्न पुढे नेत हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

संबंधित पोस्ट

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर

जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.

vishwatmaklokswamivarta

उद्या होणारी ‘TET’ परीक्षा तडकाफडकी पुढे ढकलली!  भिवंडीत प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय; पोलीस कारवाईत गुन्हा दाखल

एम्समधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· *नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण*

आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रभावित झालेली विमान सेवा व विमान उड्डाणे सुरू

vishwatmaklokswamivarta