vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार दिंडी

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार दिंडी

 

        बुलढाणा, प्रतिनिधी : संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे व त्याचे औचित्य साधून सहकार खाते व सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले असून 31 जानेवारी रोजी मेहकर येथे दाखल होणार आहे.

सहकार दिंडी मेहकर शहरामध्ये दि. 31 जानेवारी रोजी प्रवेश करणार असुन सदर दिंडी हि सोनाटी चौक– बायपास रोड लोणार कडे-कॉटन मार्केट रोड – खालचे बसस्टॅंड – व्यापारी लाईन –महेश अर्बन समोरील रोड – पोस्ट ऑफीस रोड – सत्यजीत अर्बन–जानेफळ चौक – गजानन महाराज मंदिर डोणगाव रोड मार्गाने जाणार आहे. सहकारी दिंडीचे तोरणे, पताका, रांगोळी, गुढी उभारुन स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती सहकारी संस्थाचे सहकार निबंधक यांनी दिली.

सहकार दिडींच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सभागृहात आढावा घेऊन सहकारी दिंडीचा मार्ग निश्चित करण्यात आला. यावेळी सत्यजीत अर्बन को.ऑप.क्रे.सो.मेहकरचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माधवराव जाधव, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सुदर्शन भालेराव, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार संतोष मापारी, तालुक्यातील विविध प्रकारच्या संस्थाचे अध्यक्ष, संचालक पदाधिकारी, व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.00000

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त..वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित१५ एप्रिलपर्यंत ४० ठिकाणांचे अलर्ट्स मिळणार

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याने गाठला उच्चांकी दर; 14 वर्षात पहिल्यांदाच.. पहा 24 कॅरेटचा भाव…

vishwatmaklokswamivarta

सेवा संकल्प अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा-राज्य आरोग्य हमी सोसायटीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कृपया प्रसिद्धीसाठी ! मंदिरांमधील ‘पेड दर्शन’ सुविधा बंद करा आणि देवस्थानांमध्ये राजकीय नियुक्त्या नकोत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

डाक विभागाची सांगलीत 6 जुलैला पेंशन अदालत