vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माजी सैनिकांसाठी पोलादपूर येथे मेळाव्याचे आयोजन

माजी सैनिकांसाठी पोलादपूर येथे मेळाव्याचे आयोजन

 

रायगड, प्रतिनिधी :- पोलादपूर तालुक्यामधील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांच्याकरिता शुक्रवार, दि.21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वा कॅ. विनायक मोरे हॉल पोलादपूर येथे सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे.

या मेळाव्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा विविध आर्थिक मदती, माजी सैनिक महिला बचत गट स्थापन करणे, माजी सैनिकांना रोजगार विषयक माहीती तसेच जिल्हा उद्योग केंद्र, अलिबाग यांच्याकडून नाबार्डमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहीती देण्यात येणार आहे. तसेच कल्याणकारी निधीतून मिळणारी आर्थिक मदत यांची माहिती देण्याकरीता या मेळाव्यास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी हे उपस्थित राहणार आहेत. 000000

संबंधित पोस्ट

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी 170 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती,मा.न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 फूटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बार्टीचे पाच विद्यार्थी-केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या असिस्टंट कमांडंट पदी..

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते श्री .नरेश म्हस्के यांच्याशी पर्यावरण प्रेमींचा थेट संवाद**

नसरापूर बलात्कार व खून खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती!