vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी 170 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती,मा.न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 फूटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी 170 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती,मा.न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 फूटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन

     नवी मुंबई प्रतिनिधी     संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा होणारा श्रीगणेशोत्सव नवी मुंबईकर नागरिकांनी ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करावा असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने सातत्याने केले जात आहे व त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

           नागरिकांनी पर्यावरणाची जपणूक करण्याच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची प्रतिष्ठापना न करता पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी तसेच श्रीमूर्तींचे विसर्जन नैसर्गिंक जलस्त्रोतात न करता महानगरपालिकेने ठिकठिकाणी 170 इतक्या मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांपैकी आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन तलावात करावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले आहे.

          महत्वाचे म्हणजे मा.न्यायालयाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 6 फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावयाचे आहे, याची नोंद घ्यावयाची आहे.

          याशिवाय श्रीगणेशोत्सवाच्या सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळून कापड, कागद अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करावा तसेच कर्णकर्कश्य ध्वनी टाळून मर्यादित आवाजात वाद्यांचा वापर करावा आणि लेझर लाईटचा वापर टाळावा असेही आवाहन करण्यात आलेले आहे.

          श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नसून मंडप परवानगीसाठी एक खिडकी स्वरूपात संगणकीय ऑनलाईन ई सेवा उपलब्ध करून दिल्याने मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे.

          इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे मंडळांना आवाहन करताना श्रीगणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ विसर्जनस्थळे उपलब्ध व्हावीत याची खबरदारी घेत मागील वर्षीपेक्षा वाढ करीत 170 इतक्या मोठया प्रमाणावर कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

          या कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ व अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या असून त्याठिकाणी कृत्रिम तलाव उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये बेलापूर विभागात 22, नेरुळ विभागात 29, वाशी विभागात 16, तुर्भे विभागात 21, कोपरखैरणे विभागात 16, घणसोली विभागात 16, ऐरोली विभागात 25 व दिघा विभागात 14 गावांसह 25 अशाप्रकारे एकूण 170 कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जात आहेत. नागरिकांनी मा.न्यायालयाच्या निर्णयानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 6 फूटांपेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावयाचे असून पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत मोठ्या मूर्तींसाठीही प्राधान्याने कृत्रिम विसर्जन तलावांचाच वापर करावा असे आवाहन विविध माध्यमांतून करण्यात येत आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 22 पारंपारिक विर्सजन स्थळे असून त्याठिकाणी होणारी भाविकांची गर्दी विभागली जावी व एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता मागील काही वर्षांपासून कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे.

          कृत्रिम तलावांमुळे नैसर्गिक जलस्तोतांतील जलप्रदूषणाला प्रतिबंध होऊन त्यांचे प्रदूषण कमी होत असते. नवी मुंबई हे स्वच्छ शहराप्रमाणेच पर्यावरणशील शहर म्हणून नावाजले जात असून या इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमुळे पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक यशस्वी पाऊल उचलले जात आहे. या कृत्रिम तलाव संकल्पनेला दरवर्षी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे.

          नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांमार्फत विसर्जन व्यवस्था सुसज्ज असणार असून स्वयंसेवक, जीवरक्षक, अग्निशामक यांचेसह विद्युत, सीसीटिव्ही, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निर्माल्य वाहतुक अशा सर्व सुविधा तसेच तराफे, फोर्कलिफ्ट अशी यंत्रसामुग्री सुसज्ज असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागाने गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सुयोग्य नियोजन केलेले आहे.

          तरी पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीमूर्ती शाडूची व पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे श्रीमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे अथवा नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे आणि पर्यावरणशील इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना अटक

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकविद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस,सीसीटीव्ही कॅमेरे,पॅनिक बटन सुविधा बंधनकारक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जालना जिल्ह्यात अवैध कारवायांविरोधात धडक मोहीम-आरटीओ, उत्पादन शुल्क, महसूल व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई; 10.96लाखांचा दंड, अवैध दारूसह ट्रॅक्टर जप्त

vishwatmaklokswamivarta

७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न

औद्योगिक कंपन्यांमधून मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यायला हवा – धनंजय साजेकर रोजगार मेळाव्यात १२० उमेवारांची नावनोंदणी