vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नेवासा बुद्रुक येथे अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई; तब्बल २८ लाखांचे ७० तराफे आगीच्या भक्ष्यस्थानी !

नेवासा बुद्रुक येथे अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई; तब्बल २८ लाखांचे ७० तराफे आगीच्या भक्ष्यस्थानी !

​ राज्य प्रतिनिधी-नेवासा बुद्रुक येथे अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई; तब्बल २८ लाखांचे ७० तराफे आगीच्या भक्ष्यस्थानी !

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या सक्त सूचनांनुसार, नेवासा महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात धडक मोहीम राबवली आहे.

​काल, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते मध्यरात्री ०१:०० वाजेपर्यंत नेवासा बुद्रुक येथील नदीपात्रात हे विशेष ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात आले. या कारवाईदरम्यान नदीपात्रातून वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे तब्बल ७० तराफे / चप्पू जप्त करण्यात आले. हे सर्व साहित्य नदीकाठावर आणून जाळून नष्ट करण्यात आले आहे.नष्ट केलेले साहित् य: ७० अवैध तराफे/चप्पू.अंदाजित किंमत: एका तराफ्याची अंदाजे किंमत ४०,००० रुपये असून, या कारवाईत एकूण सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

विशेष मदत: नदीपात्रातील कारवाईसाठी श्रीरामपूर येथून खास बोट व विशेष पथक पाचारण करण्यात आले होते, ज्यांची या मोहिमेत महत्त्वपूर्ण मदत झाली. ​ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी तहसीलदार हिमालय घोरपडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली

अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू तस्करी खपवून घेतली जाणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अशा घटकांवर यापुढेही प्रशासनाची करडी नजर असून कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील.

​0000000

संबंधित पोस्ट

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र शासनाचे ५, १३ आणि २३ वर्षे मुदतीचे अनुक्रमे ८०० कोटी, १६०० कोटी व १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढग फुटी भीषण पूरस्थिती अनेक अनेक मृत्युमुखी तर अनेकांचा शोध सुरू घटनास्थळी प्रशासन तत्परतेने काम चालूच

सागरी सुरक्षेसाठी १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

7 दिवस पावसाचे! मुंबईत रिमझिम पाऊस, कोकणात मुसळधार; राज्याच्या कोणत्या भागात IMD चा अलर्ट जारी?

म्हाडाची 1 ऑक्टोबर रोजी सोडत

vishwatmaklokswamivarta