vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होऊन स्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला गॅस सिलींडर हे घरपोच डिलीव्हरीद्वारेच पोहोचवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

  गॅस पुरवठ्याबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली. लोकांना सिलींडर मिळविण्यासाठी हाल सोसावे लागत असल्याने जिल्हाधिकारी स्वामी यांनी गॅस पुरवठादार संस्थांची बैठक बोलावली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, गॅस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी नितीन बजाज, शुभम चौहान तसेच रेखा केदारे, माधुरी कदम, सविता काकडे तसेच जिल्ह्यातील अन्य गॅस वितरक उपस्थित होते. जिल्ह्यात गॅसचे बुकींग वाढले आहे. युद्धाच्या पार्श्वभुमिवर हे बुकींग वाढले असून दिलेल्या मुदतीत लोकांना सिलींडर घरपोच दिले जात आहे. मार्च, एप्रिल महिन्यात असणाऱ्या सरासरी पुरवठ्या इतकीच मागणी होत असल्याचे कंपनीचे प्रतिनिधी यांनी निदर्शनास आणले.

 गॅसचे बुकींग ऑनलाईनच होत आहे. मात्र अनेक लोक सिलींडर संपल्यावर थेट सिलींडर घेऊनच एजन्सीवर गर्दी करत आहेत,असे एजन्सीधारकांतर्फे सांगण्यात आले.

 जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, कोणताही ग्राहक सिलींडर घेऊन एजन्सीवर येता कामा नये. ग्राहकाने बुकींग केल्यानंतर त्याला घरपोच डीलीव्हरीद्वारेच सिलींडर पोहोचविणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत नवीन गॅस जोडणी हे काम बंद आहे. तसेच काही ग्राहकांची ई केवायसी बाकी आहे. ते काम ग्राहक ऑनलाईन करु शकतात. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सद्यस्थितीत प्रशासनाचा एक कर्मचारी गॅस एजन्सीवर नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या २४ तासात वितरण सुरळीत करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी बजावले.

गॅस एजन्सीधारकांनी सांगितले की, काही ठिकाणी डिलीव्हरी वाहनाला पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना तातडीने निर्देशीत केले. गॅस सिलींडर ग्राहकापर्यंत नेणाऱ्या वाहनांना पोलीस पेट्रोलिंग देणे आवश्यक करावे,असे त्यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

जनधन*खातेधारकांसाठी* *रीकेवायसी*आणिजनसुरक्षायोजनांची*अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात*

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून भागवत सोनवणे यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग सुपूत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व-वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान