vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दापूर माळ विकासकामांना प्रत्यक्ष प्रारंभ; रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा व शाळा बांधकामाला गती

दापूर माळ विकासकामांना प्रत्यक्ष प्रारंभ; रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा व शाळा बांधकामाला गती

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) – शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अजनूप अंतर्गत असलेल्या दापूर माळ या अतिदुर्गम भागातील रस्त्याच्या विकासकामांना आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने गटविकास अधिकारी (शहापूर) बी. एच. राठोड याच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सर यांचे विशेष मार्गदर्शनाखाली उत्साहपुर्ण वातावरणात विकासकामांना सुरुवात आली आहे.

    या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अजनूपचे सरपंच शांताराम भगत, उपसरपंच अजय कथोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाऊ खोरगडे, उप अभियंता खेरनार, विस्तार अधिकारी पंचायत वी. एस. जाधव, ग्रामपंचायत अधिकारी मंगल परमार, एमआरईजीएस सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अंनता धलपे, स्थानिक शिक्षक संतोष बोंद्रे, रोजगार सेवक रमेश घारे, वनविभागातील वनपाल निकम, सोनवणे व कर्मचारी तसेच ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उपक्रमांतर्गत सुरू झालेली प्रमुख कामे:• रस्ते: वनविभागाच्या सहकार्याने दापूर माळपर्यंत सुमारे ५ किमी रस्त्याचे काम सुरू.• घरकुल: एकूण ३३ मंजूर घरकुलांच्या बांधकामाला प्रारंभ, CSR निधीमधून विशेष सहाय्य.• पाणीपुरवठा: अजनूप गावातून दोन टप्प्यांत लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित.• शाळा व अंगणवाडी: साहित्य वाहतूक पूर्ण करून बांधकाम प्रत्यक्ष सुरू.

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी सांगितले, “रस्ता, पाणी, घरकुल ते शाळा अशा सर्व मूलभूत सुविधांसाठी आजपासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”        या विकासकामांच्या सुरुवातीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंद, समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच दापूर माळ हा भाग सर्व मूलभूत सुविधांनी सुसज्ज होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

000

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना …

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेलवर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन,पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

महाविस्तार अपचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ